Zomato-Swiggy च्या ऑनलाइन फूडवर सरकारची असेल नजर, नियम झाले कडक

Zomato-Swiggy च्या ऑनलाइन फूडवर सरकारची असेल नजर, नियम झाले कडक

Zomato आणि Swiggy अॅपवरून तुम्ही खाद्यपदार्थ मागवता का? आता सरकारने या खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटची तयारी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : Zomato आणि Swiggy अॅपवरून तुम्ही खाद्यपदार्थ मागवता का? आता सरकारने या खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटची तयारी केली आहे. फूड रेग्युलेटर FSSAI ने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्ससाठीचे नियम आणखी कठोर केले आहेत.

Zomato आणि Swiggy या ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांना 2019 मध्ये सेल्फ ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या ऑनलाइन फूड कंपन्यांनी सुमारे 10 हजार रेस्टॉरंट डिलिस्ट केली आहेत म्हणजे ही रेस्टॉरंट त्यांनी आपल्या यादीतून काढून टाकली आहेत. या रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला नसल्याने या रेस्टॉरंट्सना वगळण्यात आलंय.

यावेळी ऑडिटचा भर स्वच्छतेवर असेल. त्याचबरोबर Cloud Kitchen वरही भर राहील. लिस्टिंगच्या माध्यमातून एनफोर्समेंट होईल. हे रेटिंग 1 ते 5 या रँकमध्ये असेल.

चीनमधली बडी इंटरनेट कंपनी अलिबाबाची सहाय्यक कंपनी अँट फायनान्शिअलने Zomato मध्ये 15 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीसाठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट अॅग्रिगेटर प्लेटफॉर्म Zomato चं व्हॅल्यूएशन 3 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 2100 कोटी रुपये झालं आहे.

(हेही वाचा : 50 % बंपर सूट : परदेशी जाण्याचा प्लॅन असेल तर इथे बुक करा तिकीट)

फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) ने मागच्या 6 महिन्यांत डिलिव्हरीचे चार्जेसही वाढवले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, या कंपन्यांनी डायनॅमिक डिस्काउंट देणं सुरू केलं आहे. त्याचबरोबर या कंपन्यांनी ऑर्डर रद्द करण्याचे नियमही कडक केले आहेत. 'झोमॅटो' ने काही दिवसांपूर्वीच उबर इट्स (Uber Eats India )ही कंपनी विकत घेतली होती. या डीलनुसार उबरला 'झोमॅटो' 9.99 टक्के शेअर्स मिळाले. झोमॅटोच्या हिशोबाने या शेअर्सची किंमत 2500 कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.

===============================================================================

First published: February 26, 2020, 3:44 PM IST

ताज्या बातम्या