Home /News /money /

50 % बंपर सूट : परदेशी जाण्याचा प्लॅन असेल तर इथे बुक करा तिकीट

50 % बंपर सूट : परदेशी जाण्याचा प्लॅन असेल तर इथे बुक करा तिकीट

तुम्ही जर परदेशात जाण्याचं प्लॅनिंग करत असाल पण महागड्या तिकिटांमुळे ते शक्य नसेल तर तुमच्याकडे मोठी संधी आहे. Vietet या कंपनीने पूर्ण आशियामध्ये विमानाच्या तिकिटावर 50 टक्के सूट देण्याचं जाहीर केलं आहे.

    नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : तुम्ही जर परदेशात जाण्याचं प्लॅनिंग करत असाल पण महागड्या तिकिटांमुळे ते शक्य नसेल तर तुमच्याकडे मोठी संधी आहे. व्हिएतजेट (Vietet)या कंपनीने पूर्ण आशियामध्ये विमानाच्या तिकिटावर 50 टक्के सूट देण्याचं जाहीर केलं आहे. ही सवलत 24 ते 29 फेब्रुवारी या काळात केल्या जाणाऱ्या बुकिंगवर मिळेल. व्हिएतनाम आणि थायलंडमधली सगळी डोमेस्टिक फ्लाइट्स आणि त्याचबरोबर भारत,जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, तैवान, सिंगापूर, मलेशिया, म्यानमार, कंबोडिया अशा देशांची सफर करायची असेल तर ही सवलत आहे. त्याचबरोबर व्हिएतनाम आणि थायलंडला जोडणाऱ्या सगळ्या आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवरही 50 टक्के सूट आहे. या प्रमोशनल ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर ही तिकिटं BOOKNOW50 या कोडवर अर्ज करून बुक करावी लागतील. या ऑफरमध्ये असलेल्या तिकिटांवर 27 एप्रिल 2020 पर्यंत प्रवास करू शकता. इथे करा तिकीट बुकिंग व्हिएतजेट ची वेबसाइट www.vietjetair.com आणि www.facebook.com/vietjeindia यावर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. याशिवाय +8419001886 आणि व्हिएतजेटच्या अधिकृत एजंट्समार्फत आणि तिकीट कार्यालयांमध्येही तुम्ही हे बुकिंग करू शकता. (हेही वाचा : Coronavirusची स्मार्टफोनलाही होतेय बाधा, टीव्ही आणि फ्रीजवरही परिणाम) भारत - व्हिएतनाम विमानं वाढवणार व्हिएतजेट ने भारत आणि व्हिएतनाम या प्रवासासाठी 5 थेट विमानं सुरू करण्याची घोषणा केली होती. या कंपनीने हनोई, हो चि मिन्ह, डेनँग अशा शहरांसाठी दिल्ली आणि मुंबईहून विमानं सोडण्यात येतील. याबद्दलची माहिती तुम्हाला व्हिएतजेटच्या वेबसाइटवर मिळेल. परदेशी पर्यटनाची आवड असणाऱ्यांमध्ये व्हिएतनामची क्रेझ आहे. त्यामुळेच या ऑफरचा फायदा पर्यटकांसाठी होऊ शकतो. ==========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Air tickets, Money

    पुढील बातम्या