Home /News /money /

Zomato शेअरमध्ये पाच दिवसात 12 टक्क्यांची घसरण, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Zomato शेअरमध्ये पाच दिवसात 12 टक्क्यांची घसरण, गुंतवणूकदारांनी काय करावं?

झोमॅटोचा स्टॉक (Zomato share Price) गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये जवळपास 12 टक्के कमी झाला. त्यामुळे या शेअरची मार्केट कॅप (Zomato Market Cap) 1 लाख कोटींच्या खाली गेली आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : झोमॅटोचे शेअर (Zomato Share Price) शुक्रवारी 21 जानेवारीच्या सत्रात BSE वर 7 टक्क्यांपेक्षा जास्त घसरून 116 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. झोमॅटोचा स्टॉक गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये जवळपास 12 टक्के कमी झाला. त्यामुळे या शेअरची मार्केट कॅप (Zomato Market Cap) 1 लाख कोटींच्या खाली गेली आहे. स्टॉक जुलै 2021 मध्ये लिस्ट झाला आणि सध्या त्याच्या IPO इश्यू किंमत 76 रुपयाच्या वर 50 टक्क्यांपेक्षा जास्त ट्रेड करत आहे. Piper Serica चे संस्थापक आणि फंड मॅनेजर अभय अग्रवाल म्हणतात, गेल्या महिन्यात Nasdaq मध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त करेक्शन झाल्यामुळे अलीकडे लिस्टेड इंटरनेट आणि Zomato सारख्या टेक्निकल शेअरमध्ये  तेजीने करेक्शन होत आहे. व्याजदर वाढल्याने टेक गुंतवणूकदार काही काळापासून पैसे काढत आहेत. सर्व टेक्निकल इंडिकेटर्स लाल झाले आहेत मात्र टेक्नोलॉजी शेअरमध्ये कोणतीही वेगाने रिबाऊंड दिसत नाही. Share Market : 'या' स्टॉक्सवर शेअर बाजारातील तज्ज्ञांची नजर; 45 टक्क्यांपर्यंत रिटर्नची अपेक्षा अग्रवाल पुढे म्हणतात की दीर्घकालीन गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये Zomato सारखे स्टॉक जोडण्याची ही एक चांगली संधी आहे कारण ते वेगाने वाढणाऱ्या उद्योगात आघाडीवर आहे आणि या क्षेत्रात फक्त एकच कंपनी आहे. कंपनीला चांगला निधी मिळत असल्याने आणि फायदेशीर युनिट लेव्हल मेट्रिक्स असल्याने, आम्ही मूल्यांकनातील सुधारणांबद्दल चिंतित नाही. परंतु टेक कंपन्या ज्यांचा नफा अस्पष्ट आहे, त्यांच्या शेअरच्या किमतीत लवकर रिकव्हरी दिसणार नाही. रिसर्च-शेअर इंडियाचे रवी सिंग म्हणतात, झोमॅटो स्टॉक तांत्रिक सेटअप इंट्राडे आणि डेली बेसिसवर मंदीच्या स्थितीत आहे ज्यामुळे नजीकच्या काळात स्टॉक 112-110 च्या पातळीवर घसरेल. कंपनीचे मूल्यांकन देखील वाढीला सपोर्ट देत नाही. तसेच झोमॅटोला स्विगीकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदारांना स्टॉक विकण्याचा सल्ला देतो. LIC Scheme : एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा; काय आहे LIC ची योजना? GCL सिक्युरिटीजचे रवी सिंघल म्हणाले की, झोमॅटोचा स्टॉक तांत्रिकदृष्ट्या कमकुवत दिसत आहे, त्यामुळे तो 127 रुपयांच्या स्टॉपलॉससह विकला गेला पाहिजे. यामध्ये 90 रुपयांचे टार्गेट पाहिले जाऊ शकते. चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया यांनी सांगितले की, तांत्रिकदृष्ट्या हा स्टॉक 120 ची पातळी देखील तोडू शकतो आणि नजीकच्या काळात तो 100 रुपयांच्या पातळीकडे सरकण्याची अपेक्षा आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Share market, Zomato

    पुढील बातम्या