मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आता झोमॅटोवर मिळणार फ्री डिलिव्हरी सर्व्हिस, फक्त करा 'हे' काम

आता झोमॅटोवर मिळणार फ्री डिलिव्हरी सर्व्हिस, फक्त करा 'हे' काम

झोमॅटो

झोमॅटो

Zomato Gold घेणाऱ्या यूझर्सला 10 किमीच्या रेडियसमध्ये अनलिमिटेड फ्री डिलिव्हरी मिळेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Mohini Vaishnav

मुंबई, 25 जानेवारी: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने पुन्हा एकदा लॉयल्टी प्रोग्राम ऑफर Zomato Gold लॉन्च केली आहे. Zomato Gold अंतर्गत, यूझर्सला जेवण आणि फूड डिलिव्हरीवर सूट दिली जाईल. मात्र, या सेवेचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला तीन महिन्यांसाठी 149 रुपये मोजावे लागतील.

मिळणार या सुविधा

Zomato Gold वापरणाऱ्यांना 10 किमीच्या रेडियसमध्ये अनलिमिटेड फ्री डिलिव्हरी मिळेल. झोमॅटोच्या मते, झोमॅटो गोल्ड ही ओळखीच्या नावाने नवीन मेंबरशीप आहे. ज्यामध्ये यूझर्सला मोफत डिलिव्हरी, विनाविलंब डिलिव्हरीची हमी, गर्दीच्या वेळी व्हीआयपी अ‍ॅक्सेस आणि इतर अनेक ऑफर्स देखील समाविष्ट आहेत. झोमॅटो यूझर्स ज्यांच्याकडे एडिशन कार्डसह प्रो किंवा प्रो प्लस मेंबरशिप आहे, त्यांची सदस्यता 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील, त्यानंतर त्यांना तीन महिन्यांची झोमॅटो गोल्ड मेंबरशिप दिली जाईल.

बचत खात्यांवर कोणती बँक किती व्याज देते? एका क्लिकवर घ्या जाणून 

यापूर्वी, झोमॅटोने आपल्या अ‍ॅपवर 10 मिनिटांच्या आत डिलिव्हरी करणारी सर्व्हिस बंद केली आहे. जी झोमॅटो इन्स्टंट म्हणून ओळखली जात होती. Zomato ने गेल्या वर्षी दिल्ली NCR आणि बंगळुरू येथून 10 मिनिटांची फूड डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली होती. कंपनीला या सेवेचा विस्तार आणि लोकप्रिय करण्यात अडचणी येत होत्या. 10 मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी कंपनीला पुरेशा ऑर्डरही मिळू शकल्या नाहीत ज्यामुळे कंपनी आपली फिक्स्ड कॉस्टही वसूल करू शकली नाही. कंपनीने म्हटले आहे की ते 10-मिनिटांची डिलिव्हरी थांबवणार नाही, परंतु त्याची पुन्हा ब्रांडींक केली जाईल.

अशी करा पैशांची बचत, स्वतःला लावून घ्या या 5 सवयी

Zomato ने मार्च 2022 मध्ये 10 मिनिट फूड डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली होती. हे झोमॅटोच्या फिनिशिंग स्टेशनद्वारे ऑफर केले जात होते जेथे वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधील 20 ते 20 बेस्ट सेलिंग डिश स्टॉक केल्या जात होत्या.

First published:

Tags: Zomato