मराठी बातम्या /बातम्या /मनी /

अशी करा पैशांची बचत, स्वतःला लावून घ्या या 5 सवयी

अशी करा पैशांची बचत, स्वतःला लावून घ्या या 5 सवयी

बचत

बचत

आपण अनेकदा विचार करतो की, या महिन्यात बचत करु. मात्र ठरवून देखील असे करणे शक्य होत नाही. यासाठी आज आपण काही स्मार्ट टिप्स जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही पैसे वाचवू शकाल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Mohini Vaishnav

 मुंबई, 25 जानेवारी: आपण अनेकदा पैसे वाचवण्याचा विचार करतो, पण तसे करु शकत नाही. खरेदीसाठी क्रेडिट कार्ड काढतो आणि स्वाइप करतो... मग महिना संपला की आपण एवढे बिल कसे आले म्हणत रडतो. अनेक अनावश्यक गोष्टींसाठी आपण हजारो रुपयो खर्च करतो. मात्र जर आपण पैसे वाचवण्यासाठी या छोट्या आणि स्मार्ट टिप्स वापरल्या तर पैशांची चांगली बचत होऊ शकते.

आपण अनेकदा विचार करतो की, या महिन्यात बचत करु. मात्र ठरवून देखील असे करणे शक्य होत नाही. यासाठी आज आपण काही स्मार्ट टिप्स जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही पैसे वाचवू शकाल.

या वर्षी श्रीमंत व्हायचेय? मग लगेच करा या 6 गोष्टी, व्हाल मालामाल 

तुम्हाला शॉपिंग लिस्ट करा तयार

तुम्हाला शॉपिंग करायला खूप आवडते. तर तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये एंट्री करण्यापूर्वीच चेकलिस्ट तयार करुन घ्या. एक्सपर्टनुसार ज्या वेळी लोक क्रेडिट आणि गिफ्ट सर्टिफिकेटसह शॉपिंग करतात तेव्हा ते लक्झरी आयटम विचार न करता खरेदी करतात. मात्र क्रेडिट कार्डने पेमेंट न करण्याचा प्रयत्न करा. यामुळे क्रेडिट कार्डने शॉपिंग करण्याची सवय मोडेल.

रिवार्ड पॉइंट क्लेम करणे विसरु नका

शॉपिंग स्टोअर आणि वेबसाइट लक्जरी प्रोडक्टच्या खरेदीवर रिवार्ड पॉइंट ऑफर करते. हे रिवार्ड पॉइंट क्लेम करणे विसरु नका. शॉपिंग करण्यापूर्वी आपले रिवॉर्ड पॉइंट घेणे विसरु नका. रिवॉर्ड पॉइंटचा फायदा उचला.

नवा व्यवसाय सुरु करायचाय? 'हे' लायसन्स घेऊन सुरु करा तुमची कंपनी 

फिटनेसवर समजूतदारपणे खर्च करा

जिममध्ये मेंबरशिप घेऊन त्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा घरात एक्सरसाइज करा किंवा पायी फिरायला जा. जिममध्ये एक महिना फिटनेस एक्सरसाइज शिका आणि नंतर ते घरीच करा. यामुळे तुम्ही 11 महिन्यांची जिम फीस वाचवू शकता.

रोज 10 रुपये गल्ल्यामध्ये टाका

तुम्ही सेविंगसाठी दररोज दहा रुपये गल्ल्यामध्ये टाकू शकता. वर्षाच्या अखेरीला हे पैसे इमरजेंसी फंड म्हणून तुम्हाला कामी येतील. तुम्ही यापेक्षा जास्त पैसे वाचवू शकत असाल तर वाचवा. यामुळे तुम्ही जास्त सेविंग करु शकता आणि तुमचे फायनेंशियल स्टेटस देखील सुधारेल.

इव्हेंट्सवर विचारपूर्वक खर्च करा

तुम्ही अनेकदा पैसे न देता अनेक अॅक्टिव्हिटीजमध्ये सामिल होता. तुम्हाला आउटडोर आणि कल्चरल इव्हेंटची माहिती व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळेल. हे ग्रुप कमी बजेटमध्ये आउटडोर इव्हेंट्स प्लान करते. उदाहरणार्थ वॉल्वो बसच्या माध्यमातून वृंदावनची यात्रा, तंबोला पार्टी इत्यादी. तुम्ही फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ट्रिप प्लान करणाऱ्या ग्रुपसोबत जोडले जाऊ शकता. यांच्यासोबत तुम्ही कमी बजेटमध्ये फिरु शकता.

First published:

Tags: Money, Savings and investments