मुंबई, 8 जुलै : जेवणाचा डबा म्हणजेच टिफिन हल्ली अनेकांची गरज बनलीय. विद्यार्थी, नोकरदार मंडळी जेवणाचा डबा देणारी सेवा शोधत असतात. यामुळे चांगलं घरगुती जेवण माफक दरात मिळत असतं. हा व्यवसाय करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. पण आता झोमॅटोही लवकरच जेवणाचा डबा सुरू करणार आहे. झोमॅटोवर ’ कभी कभी घर का खाना भी खा लेना चाहिए’ असं ट्वीट केलं होतं. त्यावर झोमॅटोचे संस्थापक दीपिंद्र गोयल यांनी हे ट्विट चांगलं आहे असं म्हटलंय. झोमॅटोचा कट्टर स्पर्धक स्विगी कंपनीनं गुरुग्राम इथे स्विगी डेली हे अॅप सुरू केलंय. त्यावर जेवणाच्या डब्याची सेवा मिळते. या अॅपचा फायदा 1 हजार ग्राहक घेत आहेत. त्यांना घरगुती जेवण मिळतं. हे नवं स्विगी अॅप सबस्रिकप्शननं मिळतं. झोमॅटोनं स्विगीच्या स्पर्धेला उत्तर म्हणून जेवणाचा डबा सुरू करायचे सिग्नल दिलेत. BARC मध्ये 47 जागांवर भरती, ‘या’ पदांसाठी करा अर्ज झोमॅटोचं मुख्य आॅफिस आहे गुरुग्रामला. 200 शहरांमध्ये झोमॅटोची सेवा आहे. एक लाखापेक्षा जास्त रेस्टाॅरंट्स झोमॅटोवर लिस्टेड आहेत. मार्च 2019मध्ये 30 मिलियन डिलिव्हरीज झाल्यात. खूशखबर, बजेटनंतर सोन्या-चांदीचे भाव स्थिरावले, जाणून घ्या आजचा दर झोमॅटोचे मुख्य अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाले, झोमॅटोची टेबल रिझर्वेशनचीही सुविधा आहे. ही सेवा भारतासह 8 देशांत आहे. 16000 रेस्टाॅरंटपैकी तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या रेस्टाॅरंटमध्ये झोमॅटोवरून टेबल बुक करू शकता. ONGC च्या नाॅन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी असं डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड मणिपाल हे शहर शैक्षणिक संस्थांचं शहर आहे. अख्ख्या देशात इथे झोमॅटोवरून जास्त डिलिव्हरी होतात. राजस्थानमधलं कोटामधून झोमॅटोवरून खाद्य मागवण्याची संख्या वाढतेय. अहमदाबादमध्येही झोमॅटो डिलिव्हरी जास्त आहे. गुजरातमध्ये आनंद शहरातून पिझ्झा जास्त आॅर्डर होतो. तर जम्मूमध्ये झोमॅटोवरून फास्ट फूडला जास्त मागणी आहे. SPECIAL REPORT : ‘गौ माता की जय’ म्हणाच, गोरक्षकांची तरुणांना बेदम मारहाण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







