मुंबई, 8 एप्रिल : कर्मचारी निरोगी असतील तर त्यांची कार्य उत्पादकता वाढेल. कर्मचाऱ्यांना निरोगी ठेवण्यासाठी अनेक कंपन्या वेळोवेळी अनेक कार्यक्रम राबवतात. त्यांच्या कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबत जागरुक व्हावे हा त्यांचा उद्देश असतो. ऑनलाइन ब्रोकरेज फर्म झिरोधाने (Zerodha) आता आपल्या कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक अनोखी पद्धत आणली आहे. वजन कमी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी झिरोधाने बोनस जाहीर केला आहे. कंपनीने या विशेष कार्यक्रमाला ‘फन हेल्थ प्रोग्राम’ असे नाव दिले आहे. झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ (Nitin Kamath) म्हणतात की त्यांचे उद्दिष्ट त्यांच्या कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त ठेवण्याचे आहे. त्यांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. ऑगस्टपर्यंत वजन कमी करणाऱ्या झिरोधाच्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 15 दिवसांचा पगार दिला जाणार आहे. एवढेच नाही तर सर्व कर्मचाऱ्यांचा सरासरी बॉडी इंडेक्स 24 वर आल्यास झिरोधा सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देईल. Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, ‘अशा’ प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा नितीन कामत यांनी ट्विट करून त्यांच्या कंपनीने सुरू केलेल्या फन हेल्थ प्रोग्रामची माहिती दिली आहे. नितीन कामथ यांनी लिहिले, “झिरोधा कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त राहण्यास प्रवृत्त करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम फन हेल्थ प्रोग्राम चालवत आहे. फन हेल्थ प्रोग्रॅमनुसार, झिरोधा कर्मचाऱ्यांचे वजन कमी झाल्यास त्यांना बोनस मिळू शकतो. तुम्ही वापरत असलले PAN Card बनावट तर नाही ना? तुमच्या मोबाईलद्वारे चेक करा, वाचा प्रोसेस झिरोधा कर्मचाऱ्यांना बोनस मिळवण्यासाठी वजन कमी करावे लागणार आहे. नितीन कामत यांनी ट्वीटमध्ये सांगितले की, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी बॉडी मास इंडेक्स (BMI) 25.3 आहे. ते म्हणाले की जर झरोधाच्या कर्मचाऱ्यांचा सरासरी BMI ऑगस्टपर्यंत 24 च्या खाली आला तर सर्व कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 15 दिवसांचा पगार मिळेल. कामत म्हणाले की, झिरोधा येथील बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय 25 पेक्षा कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून अर्ध्या महिन्याइतके वेतन मिळेल. नितीन म्हणाले की, जरी बीएमआय हे आरोग्याचे अचूक मोजमाप नसले तरी निरोगी जीवन जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.