नवी दिल्ली 23 एप्रिल: सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये (Gold Silver Rate Today) मागील काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहेत. सराफा बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये (Gold Price Today) आज तेजी आल्याचं चित्र आहे. तर, चांदीच्या किमतीदेखील वधारल्या आहेत. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) सोन्याच्या किमतीत 0.23 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर सोन्याच्या जूनच्या वायद्याचे भाव 47,884 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. चांदीच्या किमतीतही आज वाढ झाली आहे. चांदीचे दर 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 69,329 प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. एचडीएफसी सिक्यूरिटीजनुसार, गुरुवारी दिल्लीमध्ये सोन्याचे दर 168 रुपयांनी घसरुन 47,450 प्रति 10 ग्रॅमवर आले. तर, चांदीचे दर 69,117 रुपये प्रतिकिलो इतके झाले. सोन्याचे लेटेस्ट दर - सराफा बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 0.23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर जून वायद्याचे सोन्याचे भाव 47,884 प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहेत. सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; 2 महिन्यात 4 हजारानं झालं महाग, तपासा आजचे दर दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,650 प्रति दहा ग्रॅम आहे. चैन्नईमध्ये सोन्याचे दर 45,370 रुपयांपर्यंत घसरले आहेत. तर, मुंबईमधील भाव 45,250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. सोन्याची पुन्हा 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमकडे वाटचाल ? भारतात कोरोनाचं संकट पुन्हा एकदा वाढलं आहे. यामुळे गुंतणुकदार सोन्याच्या खरेदीकडे वळताना दिसत आहेत. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या किमतीत वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्यानं येत्या काही दिवसात दरात तेजी पाहायला मिळू शकते. अशी तपासा शुद्धता - सोन्याची शुद्धता (Gold Purity) तपासण्यासाठी सरकारनं एक अॅप बनवलं आहे. BIS Care app च्या माध्यमातून ग्राहक (Consumer) सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून केवळ सोन्याची शुद्धता तपासता येत नाही, तर या माध्यमातून तुम्ही तक्रारही करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







