मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँक खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी दरवेळी आकारले जाणार 5 रुपये शूल्क, वाचा काय आहे कारण

बँक खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी दरवेळी आकारले जाणार 5 रुपये शूल्क, वाचा काय आहे कारण

तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स जमा झाला आहे की नाही हे तुम्ही वारंवार तपासत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स जमा झाला आहे की नाही हे तुम्ही वारंवार तपासत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स जमा झाला आहे की नाही हे तुम्ही वारंवार तपासत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 03 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त नुकसान गरीब वर्गाचे झाले आहे. अशावेळी त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार विविध योजना घेऊन येत आहे. जनधन योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यामध्ये तीन महिन्यांसाठी प्रति महिना 500 रुपये पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या आणि इतर काही योजनांचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स जमा झाला आहे की नाही हे तुम्ही वारंवार तपासत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक आणि पेमेंट ऑपरेटर्सनी दिलेल्या माहितीनुसार या दिवसात बँक बॅलन्स चेक करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे डिजिटल सिस्टम फेल होत आहे. यामुळे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ने नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडे बँक बॅलन्स तपासणाऱ्या ग्राहकांना 5 रूपये शूल्क आकारण्यात यावे असे सुचवले आहे. मात्र सरकार किंवा आरबीआय या सूचनेचा विचार करेल अशी शक्यता कमी आहे. (हे वाचा-लॉकडाऊन असूनही या झोनमध्ये ऑनलाइन खरेदी करू शकाल मोबाइलसह इतर वस्तू) गेल्या दीड महिन्यापासून मजूर त्याचप्रमाणे इतर गरीब वर्गासाठी सोयीसुविधा देण्यासाठी विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील सरकारकडून पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. अशावेळी सहाजिकच बॅलन्स तपासून पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डिजिटल सेवांवरील ताण वाढला आहे. दुसऱ्या सेवांवर देखील याचा परिणाम होत आहे. नागरिकांनी केलेल्या ट्रान्झाक्शन पैकी अनेक ट्रान्झाक्शन  फेल होत आहेत. काही ठिकाणी खात्यातून रक्कम कापली जात आहे, परिणामी बँकांना पुन्हा ती रक्कम खात्यामध्ये भरावी लागत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर ही परिस्थिती मुळ पदावर येईल असं जाणकारांचे म्हणणे आहे. संपादन- जान्हवी भाटकर
First published:

पुढील बातम्या