नवी दिल्ली, 21 एप्रिल: देशात कोरोनाबाधितांची (Corona) संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोक संक्रमित होत आहेत. यात एकाबाजूला लोक कोरोनाविरुध्द लढत आहेत तर दुसऱ्याबाजूला त्यांना मोठ्या खर्चाने चिंतेत टाकलं आहे. या पार्श्वभूमीवर पगारी वर्गासाठी एक चांगली बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधीत खाते (EPF) असणारे लोक या खात्यातून गरजेवेळी पैसे काढू शकणार आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) निर्धारित केलेल्या निकषांनुसार कर्मचारी चित्कित्सा,आपत्कालीन स्थिती, नव्या घराची बांधणी किंवा खरेदी, घराचं नुतनीकरण, गृह कर्जाची परतफेड आणि विवाह या कारणांसाठी पैसे काढू शकतो. तसंच घरासाठी जमीन खरेदी किंवा घर खऱेदीसाठी पीएफ खात्यातून (PF Account) 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. हे वाचा - COVID-19: RT-PCR चाचणी नेगिटिव्ह, तरीही आहे कोरोना पॉझिटिव्ह येण्याची भीती ज्या लोकांना कोविड उपचारांच्या उद्देशाने या खात्यातून पैसे काढायचे आहेत ते पती किंवा पत्नी तसंच कुटुंबातील अन्य सदस्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी पैसे काढू शकतील. म्हणजेच जर कोणी कर्मचारी किंवा त्याचे आई-वडील, पती किंवा पत्नी तसंच मुले कोरोनामुळे आजारी पडले तर त्यांच्या उपचारांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. याप्रकारे ईपीएफमधून (EPF) पैसे काढण्यासाठी कोणताही लॉक इन कालावधी किंवा किमान सेवा कालावधी लागू नाही. पीएफ खात्यातून पैसे कसे काढाल - यासाठी तुम्हाला ईपीएफओ (EPFO) कार्यालयात चकरा मारायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या याबाबतची प्रक्रिया पूर्ण करू शकता. - तुम्हाला सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. - त्यानंतर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. - त्यानंतर तुम्हाला Manage या आॅप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्या पीएफ खात्याची केवायसी (KYC)झालेली आहे की नाही हे तुम्हाला तपासावे लागेल. - यानंतर तुम्हाला online Services या आॅप्शनवर जाऊन CLAIM (FORM-31, 19 आणि 10C) या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. - यानंतर क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी Proceed For Online Claim या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. हे वाचा - पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर यासाठी कर्मचाऱ्याकडे युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक (UAN) असणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्याचा बॅंक खात्याचा तपशील आणि ईपीएफ खाते जुळणं आवश्यक आहे. लक्षात ठेवावं की ईपीएफमधून काढली जाणारी रक्कम थर्ड पार्टीच्या बॅंक खात्यात हस्तांतरीत होणार नाही. पैसे देण्याऱ्यास सादर केलेल्या पुरव्यानुसार वडिलांचे नाव आणि कर्मचाऱ्याची जन्मतारीख ही जुळली पाहिजे याची काळजी कर्मचाऱ्याने घेतली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.