(हे वाचा-मशिदीत सुरू केलं कोव्हिड सेंटर, रमझानच्या महिन्यात उचललं महत्त्वाचं पाऊल)
गुजरातमधून याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार गुजरातमधील डॉक्टरांना असे अनेक रुग्ण आढळून आले की ज्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली मात्र त्यांच्या हाय रिझॉल्युशन सीटी (HRCT) मध्ये असं आढळून आलं की त्यांच्या फुप्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालं आहे.
गुजरातमध्ये ही समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे की, बडोदा महानगरपालिकेने असं निवेदन जारी केलं आहे की नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेन आरटीपीसीआर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह दाखवेलच असं नाही, पण इन्शुरन्स कंपन्यांनी आणि थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशन्सनी कोव्हिडच्या अनुषंगानेच अशा रुग्णांना सहकार्य करावे. महामारी रोग अधिनियमांतर्गत जारी करण्यात आलेल्या पालिकेच्या निवेदनात म्हटले आहे की, 'ज्या प्रकरणात आरटी-पीसीआर नकारात्मक आहे परंतु एचआरसीटी आणि प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष व्हायरल एटिओलॉजीचे सूचक आहेत त्यांचा दावा कोव्हिडसारखाच मानला पाहिजे'.
(हे वाचा-Remdesivir बाबत सरकारी टेंडरकडे कंपन्यांनी फिरवली पाठ; राज्य सरकारसमोर पेच)
मीडिया अहवालानुसार, बडोद्यातील खाजगी रुग्णालयांची संस्था असणाऱ्या सेतू (SETU) चे अध्यक्ष कृतेश शाह यांनी देखील असाच अनुभव शेअर केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'मी अशा रुग्णांच्या संपर्कात आलो ज्यांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली होती, पण रेडिऑलॉजिकल चाचण्यांनुसार त्यांना रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता होती. सीटी स्कॅनमध्ये एका रुग्णाचा स्कोअर 25 पैकी 10 होता. अर्थात त्याच्या फुप्फुसांवर आधीच परिणाम झाला होता.'
इन्फेक्शियस डिसिज स्पेशलिस्ट डॉक्टर हितेन करेलिया यांनी कोरोनाचं आणखी भीषण स्वरुप मांडलं आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, 'आम्ही काही केसेस अशा पाहिल्या की ज्यामध्ये रुग्णांमध्ये जास्त लक्षणं नाही आहेत, साधा ताप किंवा अशक्तपणा आहे. मात्र तरी देखील या रुग्णांच्या फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन अतिशय वेगाने पसरलं आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.