मुंबई, 4 ऑक्टोबर: जर तुम्हीही तुमची कमाई वाढवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही दिवसात फक्त 4 तास काम करून तुमचं मासिक उत्पन्न वाढवू शकता. ही संधी दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon द्वारे दिली जात आहे, ज्याद्वारे तुम्ही एका महिन्यात 60 हजार रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. वास्तविक, तुम्ही Amazon मध्ये डिलिव्हरी बॉय बनून चांगले पैसे कमवू शकता. या कामात तुमच्यावर कोणतंही बंधन नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूर्णवेळ किंवा अर्धवेळ हे काम करू शकता. डिलिव्हरी बॉयला कंपनीच्या गोदामातून ग्राहकांपर्यंत पॅकेज न्यावं लागते. आज Amazon ची सर्व प्रमुख शहरांमध्ये केंद्रे आहेत. देशाची राजधानी दिल्लीत Amazon ची 18 केंद्रे आहेत. तुम्हाला किती तास काम करावे लागेल? जर आपण कामाच्या तासांबद्दल बोललो, तर ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती तासांत किती पॅकेज वितरित करता. साधारणपणे एक डिलिव्हरी बॉय एका दिवसात सुमारे 4 तासात 100 ते 150 पॅकेट वितरित करतो. बाईक आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक- डिलिव्हरीचं काम करण्यासाठी तुमच्याकडं स्वतःची बाईक किंवा स्कूटर असणं आवश्यक आहे. बाईक किंवा स्कूटर विमा, आरसी वैध असणं आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. डिलिव्हरी संबंधित संपूर्ण प्रशिक्षण कंपनीकडून दिलं जातं. हेही वाचा: कमी जागेतही पपईची शेती करून मिळवू शकता लाखो रुपये, कसं ते वाचा सविस्तर डिलिव्हरी बॉयला 12 ते 15 हजार रुपये फिक्स पगार- Amazon मध्ये डिलिव्हरी बॉयला 12 ते 15 हजार रुपये पगार मिळतो. पेट्रोलचा खर्च तुमचा आहे. एखादं उत्पादन किंवा पॅकेट देण्यासाठी 10 ते 15 रुपये उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, जर कोणी महिनाभर काम करून दररोज 100 पाकिटे वितरीत करत असेल, तर एखाद्याला महिन्याला 60000 रुपयांपर्यंत सहज कमाई होऊ शकते.
डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी अर्ज कसा करावा- जर तुम्हाला डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही थेट कंपनीच्या साइटवर जाऊन अर्ज करू शकता. यासाठी थेट लिंक (https://logistics.amazon.in/applynow) येथे आहे.