मुंबई : निसर्गातील अनियमिततेमुळे शेती हा सर्वाधिक जोखमीचा व्यवसाय मानला जातो. शेतीतील वाढती जोखीम पाहता अनेक शेतकरी यातून काढता पाय घेत आहेत. परंतु, नियोजनबद्ध पद्धतीनं आणि योग्य मार्गदर्शन घेऊन मेहनत केल्यास निश्चितच अपेक्षेपेक्षा चांगला नफा शेतीतून कमावता येऊ शकतो. फळझाडांच्या लागवडीतून वर्षाला चांगला नफा मिळवता येतो. यात पपईची शेती एक चांगला पर्याय आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्ती पपईच्या माध्यमातून वर्षाला 22 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवू शकतात. परंपरागत शेती व्यवसाय करणाऱ्यांसाठी पपईची शेती एक उत्तम पर्याय आहे. यासाठी जास्त पैशांची किंवा जागेची गरज पडत नाही. शिवाय देशातील कुठल्या भागात याची शेती केली जाऊ शकते. पपईचं पीक बाजारात सहज विकता येऊ शकतं. देशात आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बिहार, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू-काश्मीर, मिझोरमसारख्या अनेक राज्यांत पपईची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यातून शेतकरी चांगला नफाही कमवत आहेत. पपईला चांगली मागणी असल्यानं घराजवळील छोट्याश्या बागेतही पपईची शेती करून शेतकरी वर्षाकाठी 22 लाखांपर्यंत नफा कमावू शकतात. काही शेतकऱ्यांच्या मते, त्यांनी आठ महिन्यांआधी दोन एकरांमध्ये पपईची 2100 रोपं लावली होते.
Post Office Scheme : फक्त 95 रुपये गुंतवा आणि मिळवा 14 लाख रुपयांचा रिटर्नकमीतकमी भांडवल गुंतवून वर्षांला 22 लाख रुपयांपर्यंत नफा कमावला आहे. पपईचे पूसा मॅजेस्टी किंवा पूसा जायंट, वॉश्गिंटन, सोलो, कोईम्बतूर, हनीड्यु, पूसा ड्वार्फ, पूसा डिलिशियस, सिलोन, छोटा पूसा असे अनेक प्रकार असतात. यात काही परदेशी हायब्रिड प्रकारही पाहायला मिळतात. याची लागवड करून त्यातून चांगली कमाई करणं शक्य आहे. पपई लागवड केल्यानंतर या गोष्टींकडे द्यावं लक्ष पपईची शेती करण्याची योजना असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. यात उन्हाळ्यामध्ये 6 ते 7 दिवसांना आणि हिवाळ्यात 10 ते 12 दिवसांनी पपईच्या झाडांना पाणी द्यावं. पावसाळ्यात मात्र पाणी देण्याची गरज नाही. पण पाऊस पडत नसला तर निश्चितच कालांतराने पाणी द्यावं लागतं. कडाक्याच्या थंडीपासून पपईला सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता असते. याशिवाय तणांपासूनही पपईचं संरक्षण करावं लागतं. पपईचं फळ कधी तयार होतं? पपईचं झाडावर 10 ते 12 महिन्यांमध्ये फळ तयार होते. हिरवी पपई तोडल्यानंतर काही दिवसांतच पिकून ते फळ पिवळं होतं. पपई तोडताना फळाला डाग किंवा काही खड्डे पडू नयेत याची काळजी घ्यावी लागते. एका पपईच्या झाडापासून जवळपास 30 ते 35 किलो पपई मिळते. प्रतिहेक्टरमागे 15 ते 20 टन पपई मिळू शकते. यातून जवळपास 22 लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.
घराच्या छतावर ‘ही उपकरणं बसवण्यासाठी सरकार देईल अनुदान; व्यवसायातून कमवा लाखो रुपयेतरुणांसाठी रोजगाराची उत्तम संधी दोन हेक्टरमध्ये पपईची लागवड केल्यास वर्षाला जवळपास 22 लाखांपर्यंत नफा मिळू शकतो. ठोक भावात प्रतिकिलो 15 रुपयांच्या भावाने पपईची विक्री केल्यास प्रतिक्विंटल 1500 रुपये मिळू शकतात. अशाप्रकारे यातून 25.5 लाखांचा नफा होऊ शकतो. या शेतीत 3 ते सोड तीन लाखांपर्यंत खर्च येतो. खर्च वगळता वर्षाला एका हंगामात 22 लाखांपर्यंत नफा कमावता येतो. पपईच्या माध्यमातून तरुणांनाही एकप्रकारे रोजगाराची उत्तम संधी प्राप्त होते.