जाहिरात
मराठी बातम्या / मनी / डिश टीव्हीमध्ये संशयास्पद गुंतवणूक? YES बँकेने व्यक्त केली शंका; वाचा काय आहे प्रकरण

डिश टीव्हीमध्ये संशयास्पद गुंतवणूक? YES बँकेने व्यक्त केली शंका; वाचा काय आहे प्रकरण

डिश टीव्हीमध्ये संशयास्पद गुंतवणूक? YES बँकेने व्यक्त केली शंका; वाचा काय आहे प्रकरण

येस बँक (YES Bank) आणि डिश टिव्हीच्या (Dish TV) वादाने आता नवीन वळण घेतले आहे. CNBC-TV18 च्या मते, Yes Bank ने अशी शंका व्यक्त केली आहे की डिश टिव्हीमध्ये का ‘संशयास्पद’ गुंतवणूक झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: येस बँक (YES Bank) आणि डिश टीव्हीच्या (Dish TV) वादाने आता नवीन वळण घेतले आहे. CNBC-TV18 च्या मते, Yes Bank ने अशी शंका व्यक्त केली आहे की डिश टीव्हीमध्ये का ‘संशयास्पद’ गुंतवणूक झाली आहे. CNBC-TV18 च्या मते, Yes Bank ने अशी शंका व्यक्त केली आहे की डिश टीव्हीमध्ये का ‘संशयास्पद’ गुंतवणूक झाली आहे. YES बँकेला असा संशय आहे की, डिश टीव्हीमध्ये काही असे ट्रान्झॅक्शन झाले आहेत ज्याचा तपशील लपवण्यात आला आहे. येस बँक या प्रकरणी आता फॉरेन्सिक ऑडिट करू इच्छिते. ओटीटी प्लॅटफॉर्म Wathdo मध्ये डिश टीव्हीच्या 1378 कोटींच्या गुंतवणुकीबाबत  Yes बँकेला ज्या संशय आहे. Yes Bank ने CNBC-TV18 ला अशी माहिती दिली की ज्या गोष्टी आधीपासून सार्वजनिक आहेत त्याबाबत नव्याने त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही. हे वाचा- घर घेण्याचा विचार करताय तर SBI देतेय कमी व्याजदरात कर्ज, प्रोसेसिंग फी देखील माफ डिश टीव्हीमध्ये येस बँकेची भागीदारी आहे. अलीकडेच बँकेने डिश टीव्हीचे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालकांना काढून टाकण्याची नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये येस बँकेने म्हटले होते की डिश टीव्हीचे बोर्ड कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे पालन करत नाही. येस बँकेला डिश टीव्हीच्या सदस्य मंडळातून 5 सदस्यांना काढून टाकायचे आहे. यामध्ये रश्मी अग्रवाल, शंकर अग्रवाल, अशोक मथाई कुरियन आणि भगवान दास नारंग यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक जवाहरलाल गोयल यांचा समावेश आहे. गोयल हे सुभाष चंद्रांचे धाकटे बंधू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात