मुंबई, 9 जुलै : Yes Bank घोटाळा प्रकरणी अखेर सक्तवसुली संचालनालय (ED) ने बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. राणा कपूर आणि कुटुंबीयांच्या मालकीची तब्बल 2200 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. DHFL चे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्या संपत्तीवरही टाच येणार आहे. दुसऱ्या एका आर्थिक घोट्याळ्याच्या केसमध्ये वाधवान बंधू आधीच CBI च्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान येस बँकेच्या राणा कपूरच्या मालकीची मुंबई, पुण्यासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये असणारी मालमत्ता जप्त होणार आहे. यामध्ये मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत पेडर रोडवरचे 6 प्रशस्त फ्लॅट्स आणि मलबार हिलचा आलिशान बंगला याचा समावेश आहे. लंडनमध्येही राणा कपूर यांची मोठी मालमत्ता होती. त्यावरही टाच आली आहे.
येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून 600 कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे. 30000 कोटींअधून अधिक रक्कम कर्ज म्हणून बेकायदेशीरपणे मंजूर केल्याचा राणा कपूर यांच्यावर आरोप आहे. 2004 मध्ये त्यांनी येस बँक स्थापन केली आणि 201९ पर्यंत ते बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO होते. याच काळात पैशांची अफरातफर झाली आहे. मोदी सरकार देत आहे स्वस्त सोने, खरेदी करण्यासाठी उद्या शेवटची संधी येस बँकेनं डीएचएफएलला 3,750 कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना 750 कोटींचे कर्ज दिलं.