मोदी सरकार देत आहे स्वस्त सोने, खरेदी करण्यासाठी उद्या शेवटची संधी

मोदी सरकार देत आहे स्वस्त सोने, खरेदी करण्यासाठी उद्या शेवटची संधी

मोदी सरकारकडून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमअंतर्गत सोनेखरेदी करण्याची 10 जुलै 2020 ही शेवटची तारीख आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जुलै : सोन्याच्या किंमती रोज नवे रेकॉर्ड रचत आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे भाव (Gold Price Today) आज 49,318 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे इतर शुद्धतेच्या सोन्यामध्ये देखील किंमती वाढल्या आहेत. दरम्यान अशावेळी गोल्ड बाँडमध्ये गुंकवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. अशावेळी मोदी सरकार (Modi Government)  स्वस्तामध्ये गोल्ड बाँड खरेदी करण्याची संधी देत आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2020-21 (Sovereign gold bond scheme 2020-21) ची सीरीज-4 सध्या सुरू आहे. या योजनेअंतर्गत गोल्ड बाँड खरेदी करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. 06 जुलै ते 10 जुलै दरम्यान सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या या टप्प्यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

ऑनलाइन खरेदीवर अतिरिक्त सूट

त्याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) खरेदीसाठीचा चौथा टप्पा 6 जुलै 2020 ते 10 जुलै 2020 पर्यंत असणार आहे. यावेळी जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या बाँडची किंमत (SGB Issue Price) 4,852 रुपये प्रति ग्रॅम आहे. तसंच सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. ऑनलाइन गुंतवणूकदारांसाठी इश्यू प्राइस 4,802 रुपये आहे.

(हे वाचा-सोन्याचे रेकॉर्ड ब्रेकिंग दर कायम, लवकरच 50 हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता)

पारंपरिक पद्धतीने सोने खरेदी करण्यापेक्षा सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदी करण्याचे अतिरिक्त फायदे मिळतात. सोन्याच्या किंमतीमधील फायद्या व्यतिरिक्त 2.5 टक्के दराने व्याज देखील मिळते. अर्थतज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता असल्या कारणाने सोन्याचे दर येत्या काळात आणखी वाढू शकतात,  अशावेळी गोल्ड बाँडमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

सॉव्हरेन गोल्ड बाबतच्या महत्ताच्या गोष्टी

-केंद्र सरकार सॉव्हरेन गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी तेव्हा देत आहे, जेव्हा देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती सतत वाढत आहेत.

-रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी करतात. 2015 मध्ये ही योजना पहिल्यांदा जारी करण्यात आली होती. जेणेकरून बाजारातील फिजिकल सोन्याची मागणी कमी करता येईल. देशांतर्गत बाजारात आर्थिक बचत करणे हा देखील यामागचा एक हेतू होता.

- भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

(हे वाचा-मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारचे महत्त्वाचे निर्णय,वाचा तुमचा काय फायदा होणार)

-यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे.

-चौथ्या टप्प्यातील गोल्ड बाँडच्या इश्यूची तारीख 14 जुलै आहे.

-Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता.

-आरबीआयने जाहीर केल्याप्रमाणे सप्टेंबरपर्यंत सॉव्हरेन गोल्ड बाँडचे 6 टप्पे जारी करण्यात येणार आहेत. या योजनेचा पुढील टप्पा 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान जारी केला जाईल. 11 ऑगस्ट रोजी याची इश्यू तारीख आहे. तर शेवटचा टप्प्यातील सब्सक्रिप्शन 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान करता येणार आहे. याची इश्यू तारीख 8 सप्टेंबर आहे.

(हे वाचा-नोकरदार वर्गाला दिलासा! PFमधून पैसे काढण्यासाठी आता द्यावी लागणार नाहीत कागदपत्र)

-गोल्ड बाँडवर गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 2.5 दराने व्याज मिळेल. या बाँडवर मिळणाऱ्या व्याजाला सब्सक्राइबर्स च्या उत्पन्नात जोडले जाईल, त्यावर त्याला टॅक्स द्यावा लागेल.

-गोल्ड बाँडचा मॅच्यूरिटी पीरिअड 8 वर्षांचा असतो, पण गुंतवणूकदाराकडे पर्याय असतो की त्याला 5 वर्षात हे काढू शकतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 9, 2020, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading