मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Vicky Safra: ही आहे जगातील सर्वांत श्रीमंत महिला; 90 अब्ज डॉलर्सचा आहे बिझनेस

Vicky Safra: ही आहे जगातील सर्वांत श्रीमंत महिला; 90 अब्ज डॉलर्सचा आहे बिझनेस

जगातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साफ्रा यांचा बँकिंग (Banking), रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेला अवाढव्य व्यवसाय आहे.

जगातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साफ्रा यांचा बँकिंग (Banking), रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेला अवाढव्य व्यवसाय आहे.

जगातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साफ्रा यांचा बँकिंग (Banking), रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेला अवाढव्य व्यवसाय आहे.

 नवी दिल्ली, 9 जून: पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तुत्त्व सिद्ध करणाऱ्या महिलांची शक्ती सगळ्या जगानं मान्य केली आहे. कोणत्याच क्षेत्रात आता महिला मागं नाहीत. अगदी श्रीमंतीच्या शर्यतीतही. जगभरातील श्रीमंताच्या यादीवर नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल. या यादीत महिलांची संख्याही लक्षणीय आहे. याच यादीतलं एक नाव आहे विकी साफ्रा (Vicky Safra).

68 वर्षीय विकी साफ्रा या ‘साफ्रा फॉर्च्युन’च्या (Safra Fortune) एकमेव मालक आहेत. जगातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साफ्रा यांचा बँकिंग (Banking), रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेला अवाढव्य व्यवसाय आहे. साफ्रा कुटुंबाचा बँकिंग व्यवसाय सुमारे 180 वर्ष जुना असून, ते ब्राझीलमधील (Brazil)सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. ब्लूमबर्ग बिलीयेनर इंडेक्सनुसार, विकी साफ्रा आणि तिच्या मुलांची एकूण संपत्ती 16.2 अब्ज डॉलर्स आहे.

टीव्ही9 हिंदी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, विकी साफ्रा केवळ 17 वर्षांच्या असताना त्यांचे लग्न ब्राझीलमधील प्रसिद्ध व्यापारी, बँकर जोसेफ साफ्रा (Joseph Safra) यांच्याशी झाले. 1938 मध्ये लेबनॉनमध्ये जन्मलेले जोसेफ साफ्रा यांचे कुटुंब 1953 मध्ये ब्राझीलला स्थलांतरीत झालं होतं. तर मूळच्या ग्रीसमधील असलेल्या विकी यांचे कुटुंब 1950च्या दशकात ब्राझीलमध्ये आले होते. या दोघांची ब्राझीलमध्ये भेट झाली आणि नंतर विवाह झाला. विकी आणि जोसेफ यांनी आपला बहुतांश वेळ स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) घालवला.

Explained :झटपट श्रीमंत बनवणारी क्रिप्टोकरन्सी वादग्रस्त का?भारतात काय आहे नियम

साफ्रा कुटुंबाच्या पूर्वजांनी 1840 मध्ये बँकिंग व्यवसाय सुरू केला होता. तो जोसेफ साफ्रा यांनी वाढवला. 2013 मध्ये जोसेफ यांना रिअल इस्टेटचे महत्त्व लक्षात आलं आणि त्यांनी अमेरिका, युरोपमधील डझनभर मालमत्ता विकत घेतल्या. 2014 मध्ये त्यांनी लंडनमधील घेरकिन बिल्डिंग (Gherkin Building) तब्बल 700 दशलक्ष पौंडात विकत घेतली. याशिवाय न्यूयॉर्कमधील 660 मॅडीसन अॅव्हेन्यू (Madison Avenue) ही प्रॉपर्टीही साफ्रा यांच्या मालकीची आहे. ऑगस्ट 2020 मध्ये फोर्ब्स यादीत जोसेफ साफ्रा हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 52 व्या स्थानावर होते. त्यांची संपत्ती होती तब्बल 22.8 अब्ज डॉलर्स. जोसेफ यांचे वयाच्या 82 व्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले. त्यानंतर या संपूर्ण उद्योग समूहाची सूत्रे विकी साफ्रा यांच्या हातात आली. विकी साफ्रा यांच्याकडे स्वित्झर्लंडची जे. साफ्रा सरासिन (J Safra Sarasin) आणि ब्राझीलची बँको साफ्रा (Banco Safra) याची जबाबदारी आहे. या दोन बँकांची एकूण मालमत्ता सुमारे 90 बिलियन डॉलर्स आहे.

कचरा वेचणाऱ्यांसह काम करुन कचऱ्यापासून बनवल्या हँडबॅग;आज आहे 100 कोटींचा टर्नओवर

जोसेफ आणि विकी यांच्या चार मुलांपैकी मोठा मुलगा जेकब साफ्रा या समूहाच्या व्यवसायाचं आंतरराष्ट्रीय कामकाज पाहतो. तर सर्वात धाकटा मुलगा डेव्हिड हा ब्राझीलमधील व्यवसाय सांभाळतो. इतर दोन मुले कौटुंबिक व्यवसायात सामील नाहीत आणि ते इतर क्षेत्रात कार्यरत आहेत.

वयाच्या 68 व्या वर्षी दोन बलाढ्य बँकाचा व्यवसाय सांभाळणाऱ्या विकी साफ्रा या आजच्या नवीन पिढीसाठीही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत, यात शंका नाही.

First published:

Tags: Richest woman