मराठी बातम्या /बातम्या /मनी /निवृत्तीपूर्वी PF मधून पैसे काढत असाल तर सावधान; होऊ शकतं नुकसान

निवृत्तीपूर्वी PF मधून पैसे काढत असाल तर सावधान; होऊ शकतं नुकसान

नोकरदार निवृत्त झाल्यावर अर्थिक आधार देण्यात PF चा मोठा वाटा असतो. पण निवृत्तीच्या वयापूर्वी या खात्यातून पैसे काढण्यापूर्वी विचार करा. हे वाचा..

नोकरदार निवृत्त झाल्यावर अर्थिक आधार देण्यात PF चा मोठा वाटा असतो. पण निवृत्तीच्या वयापूर्वी या खात्यातून पैसे काढण्यापूर्वी विचार करा. हे वाचा..

नोकरदार निवृत्त झाल्यावर अर्थिक आधार देण्यात PF चा मोठा वाटा असतो. पण निवृत्तीच्या वयापूर्वी या खात्यातून पैसे काढण्यापूर्वी विचार करा. हे वाचा..

वी दिल्ली, 8 जून : पीएफ (PF) हा नोकरदारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण नोकरदार आपल्या भविष्याची अर्थिक तजवीज या माध्यमातून करत असतो. नोकरदार निवृत्त झाल्यावर अर्थिक आधार देण्यात पीएफचा मोठा वाटा असतो. पीएफचे महत्व जाणून सरकारने देखील ही यंत्रणा ऑनलाईन करत, त्यात अधिक सुटसुटीतपणा आणला आहे. नोकरदार व्यक्ती त्याच्या पीएफ अकाऊंटचा तपशील ऑनलाईन मिळवू शकते. यामुळे आर्थिक नियोजन करणं अनेकदा सोपं जातं. निवृत्तीनंतर आपल्या हातात पीएफच्या माध्यमातून किती रक्कम पडेल याचा अंदाज ऑनलाईन यंत्रणेमुळं नोकरदाराला येतो. मात्र पीएफ खात्यातून निवृत्तीपूर्वी पैसे काढणं नोकरदार व्यक्तीला तोट्याचं ठरू शकतं.

खासगी क्षेत्रात 2 ते 3 वर्षांनी नोकरी बदलण्याचा ट्रेंड आहे. परंतु, नोकरी बदलतेवेळी पहिल्या कंपनीकडे असलेली पीएफची सर्व रक्कम काढून घेणं तुमच्यासाठी तोट्याचं ठरू शकतं. यामुळे भविष्यासाठी तुम्ही जमवलेली पुंजी आणि फंड संपुष्टात येऊ शकतो. तसेच पेन्शनचे (Pension) सातत्य राहत नाही. त्यामुळे नवी कंपनी जॉईन करताना तुमचा पीएफ तुम्ही जुन्या कंपनीशी जोडून घ्यावा. निवृत्त झाल्यावरही तुम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही काही वर्ष पीएफ सोडून देऊ शकता.

कोविड-19साठी मिळत असलेल्या आगाऊ रकमेचा लाभ घेताना विचार करा

हे ही वाचा: दहा हजार गुंतवणूक करून मिळवा 16 लाखाचा फायदा, पाहा काय आहे पोस्टाची ही स्कीम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) पुन्हा एकदा कोविड-19 आगाऊ रकमेची योजना सुरु केली आहे. या योजनेतून तुम्ही तुमच्या प्रॉव्हिडंट फंडातून 3 महिन्यांच्या वेतनाशी समतुल्य रक्कम काढू शकता. तातडीच्या गरजेवेळी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. कारण पीएफ फंडातून (PF Fund) पैसे काढल्यास त्याचा परिणाम तुमच्या निवृत्ती फंडातील रकमेवर होऊ शकतो.

3 वर्षांपर्यंत मिळते व्याज

निवृत्त झाल्यावरही तुम्ही पीएफचे पैसे काढले नाहीत तर 3 वर्षांपर्यंत त्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळते. मात्र 3 वर्षांनंतर हे खातं निष्क्रिय समजले जाते. पीएफची रक्कम ही बहुतांश लोक भविष्यातील सुरक्षित निधी म्हणून जमवतात. मात्र तातडीच्या गरजेसाठी जर तुम्हाला रक्कम काढायचीच असेल तर केवायसी (KYC) होणं गरजेचं आहे. जर कोणतिही व्यक्ती 2 महिन्यांपेक्षा अधिक बेरोजगार राहिला असेल तर तो पीएफ खात्यातून सर्व रक्कम काढू शकतो. परंतु, नोकरी सोडल्यानंतर एका महिन्याने या खात्यातून 75 टक्के रक्कम काढता येते. यामुळे खातं सुरु राहतं आणि आपली गरजही भागते. जर सेवाकालावधी 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर निवृत्तीवेतनाची संपूर्ण रक्कम देखील काढता येते. मात्र सर्वसामान्यपणे पीएफची रक्कम निवृत्तीनंतर (Retirement) काढता येते.

First published:

Tags: Pf, PF Withdrawal