मराठी बातम्या /बातम्या /मनी /दहा हजार गुंतवणूक करून मिळवा 16 लाखाचा फायदा, पाहा काय आहे पोस्टाची खास स्कीम

दहा हजार गुंतवणूक करून मिळवा 16 लाखाचा फायदा, पाहा काय आहे पोस्टाची खास स्कीम

तुम्हाला गुंतवणूकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम नको असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना (Post office Scheme) हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना (Small Savings Scheme) अधिक चांगल्या असून यात चांगला परतावा मिळतो

 नवी दिल्ली 05 जून : आपण सुरक्षित गुंतवणूक योजनेचा (Secure Investment scheme) शोध घेत असाल, तुम्हाला गुंतवणूकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम नको असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना (Post office Scheme) हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना (Small Savings Scheme) अधिक चांगल्या असून यात चांगला परतावा मिळतो. या योजनांमध्ये अगदी कमी खर्चात गुंतवणूक करता येते, त्या तुलनेत परतावा अतिशय चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसच्या अशा विविध योजनांपैकी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना (Post office Recurring Deposit) ही एक उत्तम योजना आहे. कमी गुंतवणुकीत चांगला फायदा मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.

काय आहे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना  :

पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट अकाउंट (Recurring Deposit Account) ही एक सरकारी खात्रीशीर योजना आहे. या योजनेत तुम्ही अगदी कमी पैशात गुंतवणूक करू शकता. याशिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. यात तुम्ही दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तर गुंतवणूकीला कमाल मर्यादा नाही. ही योजना 5 वर्षांसाठी असते. दर तिमाहीत जमा झालेल्या पैशांवर चक्रवाढ पद्धतीनं व्याज जमा होते. पोस्ट खात्याच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या या योजनेवर 5.8 टक्के दरानं व्याज देण्यात येत आहे.

केंद्र सरकार आपल्या सर्व अल्पबचत योजनांसाठी दर तिमाहीला व्याज दर जाहीर करते. त्यामुळं या योजनेचे व्याजदरही दर तिमाहीला बदलतात.

10 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल :

या योजनेत तुम्ही दहा वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 16 लाख 26 हजार 476 रुपये मिळतील.

या योजनेबाबत काही महत्त्वाच्या बाबी :

या योजनेत आपण हप्ता वेळेवर जमा न केल्यास आपल्याला दंड भरावा लागेल. हप्ता भरायला उशीर झाल्यास दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. तसंच सलग 4 हप्ते जमा न केल्यास खातं बंद होईल. खातं बंद झाल्यास, 2 महिन्यांनी पुन्हा सुरू केलं जाऊ शकते.

First published:

Tags: Money, Post office saving