दर महिन्याला एक लाख रुपये कमावण्यासाठी सुरु करा ‘हा’ व्यवसाय!

दर महिन्याला एक लाख रुपये कमावण्यासाठी सुरु करा ‘हा’ व्यवसाय!

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) मागील आर्थिक वर्ष अनेकांसाठी त्रासदायक गेलं. नव्या वर्षात नव्या स्वप्नांसह व्यवसाय सुरु करायचं तुमच्या मनात असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी :  कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) मागील आर्थिक वर्ष अनेकांसाठी त्रासदायक गेलं. या संकटामुळे अनेक उद्योगांनी कामगारांची कपात केली आहे. अचानक आलेल्या संकटामधून बाहेर पडण्याचा आता सर्वजण प्रयत्न करत आहेत. नोकरी न करता काही जण स्वत:चा व्यवसाय सुरु करत आहेत. तर काही जण आपल्या सध्याच्या व्यवसायाशी निगडित नवं काम शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘हा व्यवसाय फायदेशीर’

नव्या वर्षात नव्या स्वप्नांसह व्यवसाय सुरु करायचं तुमच्या मनात असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्हाला कृषी क्षेत्राशी (Agriculture  Sector ) निगडीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर अनेकदा लहरी हवामानाचा फटका त्याला बसतो. हवामानावर अवलंबून न राहता देखील अनेक व्यवसाय कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. यामध्ये  कुक्कुटपालन (Poultry Farming) हा प्रमुख व्यवसाय आहे. हा व्यवसाय 5 ते 9 लाख रुपये भांडवलाच्या आधारावर सुरु करता येऊ शकतो. अगदी छोट्या प्रमाणात म्हणजे 1500 कोंबड्या घेऊन हा व्यवसाय सुरु केला तरी महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये कमाई होऊ शकते.

किती येईल खर्च?

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी जागा, पिंजरे आणि साहित्यासाठी 5 ते सहा लाख रुपये खर्च येईल. 1500 कोंबड्यांचं टार्गेट ठेवून हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यापेक्षा दहा टक्के जास्त कोंबड्या खरेदी करा. कारण, अचानक आजारी पडून कोंबड्या मरण्याची भीती असते.

अंड्यांच्या विक्रीतून चांगली कमाई

देशात अंड्याचे दर वाढ आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून एक अंडा 7 रुपयाला विकला जात आहे. त्यामुळे अंड्याच्या विक्रीमधून चांगली कमाई होऊ शकते. त्याचबरोबर कोंबडी देखील आणखी महाग झाली आहे.

कोंबड्या खरेदी करण्याचं बजेट 50 हजार रुपये

एका लेयर पॅरेंट बर्थची किंमत जवळजवळ 30 ते 35 रुपये असते. कोंबड्या खरेदी करण्याचं बजेट 50 हजार रुपये लागेल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं धान्य द्यावं लागतं. याशिवाय त्यांच्या औषधांवरही खर्च करावा लागतो.

20 आठवड्यांचा खर्च 3 ते 4 लाख रुपये

20 आठवड्यांपर्यंत कोंबड्यांना खाद्य देण्याचा खर्च 1 ते 1.5 लाख रुपये आहे. एक लेयर पॅरेंट बर्ड वर्षभरात जवळजवळ 300 अंडी देतं. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी देणं सुरू करतात. वर्षभर अंडी देतात. 20 आठवडे त्यांच्या खाण्या-पिण्यावर जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये खर्च होतात.

वर्षाला 14 लाख रुपयांपर्यंत कमाई

1500 कोंबड्या दर वर्षी 4,35,000 अंडी देतात. नुकसान होऊन 4 लख अंडी वाचली तर एक अंडं 3.5 रुपयांना पडतं. म्हणजे वर्षभर तुम्ही अंडी विकून 14 लाख रुपये कमाई करू शकता.

चांगलं ट्रेनिंग आवश्यक

या व्यवसायात कमाई उत्तम आहे, मात्र हा व्यवसाय सुरु करण्यासाठी याचं चांगलं ट्रेनिंग आवश्यक आहे.

Published by: News18 Desk
First published: January 23, 2021, 11:51 AM IST

ताज्या बातम्या