जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Whale Vomit: उलटीलाही कोट्यवधींची किंमत, तज्ज्ञ म्हणतात हे तरंगणारं सोनं!

Whale Vomit: उलटीलाही कोट्यवधींची किंमत, तज्ज्ञ म्हणतात हे तरंगणारं सोनं!

Whale Vomit: उलटीलाही कोट्यवधींची किंमत, तज्ज्ञ म्हणतात हे तरंगणारं सोनं!

Whale Vomit: व्हेल माशाच्या उलटची (Whale Vomit)किंमत लाखो करोडों रुपयांमध्ये असते. याची किंमत एवढी का असते जाणून घ्या

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 मार्च: पाण्यात राहणारा जगातील सर्वात मोठा प्राणी म्हणजे व्हेल. हा मासा समुद्रात आढळतो. दरम्यान तुम्ही अनेकदा वाचलं असेल की व्हेल माशाच्या उलटीला कोट्यवधींची किंमत मिळते. तर असं का? हे ऐकून काहींना आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. जर एखाद्याला ही उलटी सापडली तर समजा त्याचं नशीबच फळफळेल. थायलंडमध्ये एका मच्छिमारला 100 किलो व्हेलची उलटी सापडली आणि तो करोडपडी झाला आहे.  भारतात एक किलो व्हेल उलटीची किंमत कोट्यवधी रुपये आहे. काय आहे Whale Vomit? व्हेल माशाच्या शरिरातून एक टाकाऊ घटक (Waste) बाहेर पडतो. या शास्त्रज्ञ व्हेल माशाची उलटी (Ambergris) म्हणतात. अनेकदा हा घटक रेक्टमच्या माध्यमातून बाहेर पडतो, पण काही वेळा मोठ्या प्रमाणात हा टाकाऊ घटक त्याच्या शरिरात तयार झाल्यास व्हेल मासा तो तोंडाद्वारे बाहेर टाकतो. वैज्ञानिक भाषेत त्याला Ambergris म्हणतात. Ambergris याकरता कारण तो amber सारखा दिसतो. ताज्या Ambergris चा वास विष्ठेप्रमाणे असतो, पण कालांतराने त्याचा वास मातीसारखा येऊ लागतो. साधारण दगडासारखा हा घटक तयार होत असून त्याचे वजन पाच ते पन्नास किलोपर्यंत असू शकते. (हे वाचा- Explainer: पाकचा नवा कारनामा! काश्मीरमध्ये आढळलेले स्टिकी बॉम्ब नेमकं काय आहे? )

News18

उद्योग जगतात विशेष मागणी याचा उपयोग परफ्यूम उद्योगात केला जातो. त्यामध्ये असणारा अल्कोहोलचा वापर महाग ब्रँड परफ्युम बनवण्यासाठी केला जातो. याच घटकाच्या मदतीने परफ्यूमचा वास बराच काळ टिकवून ठेवता येतो. यामुळे, त्याची किंमत सर्वाधिक आहे. वैज्ञानिक व्हेल माशाच्या उलटीला तरंगणारे सोने म्हटले आहे, ते याकरताच. थायलंडमध्ये मच्छीमाराला हा तुकडा मिळवून त्या उलटीची गुणवत्ता उत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर एका व्यापाऱ्याने त्याला 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. अनेक देशांमध्ये एम्बरग्रिसचा वापरा सुगंधित धूप आणि अगरबत्ती बनवण्यासाठी केला जातो. संपूर्ण देशभरातील बाजारात व्हेल माशाच्या उलटीला भारी किंमत मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात