Home /News /explainer /

Explainer: पाकचा नवा कारनामा! काश्मीरमध्ये आढळलेले स्टिकी बॉम्ब नेमकं काय प्रकरण आहे?

Explainer: पाकचा नवा कारनामा! काश्मीरमध्ये आढळलेले स्टिकी बॉम्ब नेमकं काय प्रकरण आहे?

काश्मीरमध्ये तैनात सैन्याने गेल्या काही दिवसांत बरेच स्टिकी बॉम्ब (Sticky bomb in Kashmir) जप्त केले आहेत. यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली, 3 मार्च  : नियंत्रण रेषेवरील (LAC) संघर्षविरामाबाबत नव्याने समझोता झाला असला तरी पाकिस्तानच्या (Pakistan) हरकती सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या वृत्तांनुसार पाकिस्तानमधून ड्रोनच्या सहाय्याने काश्मिरमध्ये स्टिकी बॉम्बव्दारे (Sticky Bomb) हल्ले केले जात आहेत. हे बॉम्ब चुंबकाच्या मदतीने गाड्यांमध्ये लावता येतात आणि दहशतवादी रिमोटच्या (Remote operated bomb) साहाय्याने त्याचा स्फोट करु शकत असल्याने ते अधिक धोकादायक आहेत. स्टिकी बॉम्ब म्हणजे काय (what is sticky bomb which Pakistan used in Kashmir) हे समजून घेण्याआधी भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या ताज्या घडामोडींविषयी जाणून घेऊ. 2019मधील पुलवामा हल्ल्यानंतर दोन देशांमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. दोन्ही देशांनी आपल्या हाय कमिशनमधील अधिकाऱ्यांना परत बोलावलं होतं. या दरम्यान पाकिस्तान (Pakistan) आणि चीन यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली तर भारत (India) आणि चीन (China) दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली. चीन भारताचा विकास पाहून घाबरलाय अशी चर्चा सुरु झाली. यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा प्यादे म्हणून वापर केला गेला. आता गेल्या काही दिवसांपासून भारत – पाकिस्तानमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 25 फेब्रुवारीला दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेवरील कराराचे काटेकोर पालन करण्याबाबत चर्चा केली. याला पाकिस्तानने संमती दिली असली तरी त्यांच्या कारवाया सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मिरमध्ये एक नव्या प्रकारचा बॉम्ब आढळून आला. याला स्टिकी बॉम्ब असं म्हणतात. अफगणिस्तानमध्ये (Afghanistan) स्टिकी बॉम्बचा वापर करुन दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली होती. हे बॉम्ब दिसायला आयईडीसारखे (IED) असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यास आईडी म्हणजेच इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस समजलं जातं. हे बॉम्ब रस्त्याच्याकडेला किंवा कोणत्याही वस्तुत ठेवले जातात. यावर कोणतेही वजन किंवा व्यक्तीचा पाय पडल्यास त्याचा स्फोट व्हावा, यादृष्टीने ते तयार केलेले असतात.  परंतु, स्टिकी बॉम्ब हे जास्त धोकादायक असतात, कारण ते रिमोटव्दारे काम करतात. हे बॉम्ब पाहिजे त्या ठिकाणी ठेवले जातात आणि योग्य वेळी रिमोटच्या सहाय्याने त्याचा स्फोट घडवला जातो. फेब्रुवारी महिन्यात काश्मिरमध्ये (Kashmir) टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये अनेक ठिकाणी हे बॉम्ब आढळून आले. यापूर्वी अफगणिस्तान या बॉम्बमुळे चर्चेत आला होता. तालिबानी तेथे या बॉम्बच्या माध्यमातून दहशत पसरवत होते. अफगणिस्तानमधील दहशतवादी (Terrorists) याला जबाबदार आहेत की पाक दहशतवादी हे काश्मिरमध्ये अफगणिस्तानच्या मदतीने हे कृत्य करीत आहेत, अशी शंका आता उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील अफगणिस्तान संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. परंतु, आम्ही केवळ काश्मिरला नैतिक पाठिंबा देतो, कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांमध्ये आमचा सहभाग नसल्याचे अफगणिस्तानने स्पष्ट केलं आहे. असे असले तरी काश्मिरमध्ये स्टिकी बॉम्ब आढळून आल्याने काश्मिरमध्ये तैनात सैन्य अधिक सतर्क झालं आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्या. मात्र तेथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात केल्याने या कारवाया कमी झाल्या असाव्यात किंवा दहशतवादी योग्य वेळेची आणि सुरक्षा सैल होण्याची वाट पाहात असावेत का असे प्रश्न व्यक्त केले जात आहेत. अशा प्रकारचे बरेच प्रश्न सध्या सुरक्षा एजन्सींकडे आहेत.

अवश्य वाचा -    नीरवच्या प्रत्यार्पणाची परवानगी मिळवणं सोपं नव्हतं; काय होता नेमका प्लान? वाचा सविस्तर

रिमोटव्दारे संचालित होणारे स्टिकी बॉम्ब जप्त केल्यानंतर ते काश्मिरमध्ये पोहोचले कसे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका अज्ञात अधिकाऱ्याने अशी शंका व्यक्त केली की हे बॉम्ब ड्रोनच्या माध्यमातून सोडण्यात आले किंवा ते गुप्त भुयारांमधून काश्मिरमध्ये आणले गेले. कारण काश्मिर आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या मार्गादरम्यान सातत्याने भुयारे आढळून येत आहेत. ही भुयारे आढळून आल्यानंतर ती बुजवली जात असून परिसरात सुरक्षादेखील वाढवण्यात येत आहे. स्टिकी बॉम्ब सापडल्याने आता सावधगिरी बाळगली जात आहे. खासगी गाड्या आणि सैन्याच्या वाहनांमध्ये मोठे अंतर ठेवले जात आहे. तसेच सैन्याच्या वाहनांवर दूरवर नजर ठेवण्यासाठी शक्तिशाली कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच काश्मिरमधील ठराविक भागांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने संशयास्पद घडामोडी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Explosives, India, Jammu and kashmir, Pakistan, Terrorist

पुढील बातम्या