मुंबई : TCS चे CEO राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला याची चर्चा सुरू झाली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. टाटा ग्रूपला देखील या निर्णयाचा फटका बसणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे आता राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा का राजीनामा दिला याबाबत खरं कारण सांगितलं आहे. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार गोपीनाथन म्हणाले की डोक्यात असा विचार सतत चालू होता, पण त्याकडे फारसे लक्ष दिलं नव्हतं. टीसीएसमध्ये या पदावर काम करताना गेल्या दोन महिन्यांपासून मनात प्रचंड गोंधळ सुरू होता होता. आता पुढे काय?
14 लाख कोटींची कंपनी सांभाळणारे सौरभ अग्रवाल कोण? पगार ऐकून व्हाल अवाक्मी या पदावर बसलो ते TCS च्या भविष्याचा विचार करण्यासाठी पण माझ्या भविष्याचं काय असा प्रश्न मला सतत भेडसावत होता. मी एक गोष्ट मनात ठरवली होती ज्या दिवशी मनाला कंटाळा येईल त्या दिवशी इथे एक क्षणही थांबायचं नाही. त्यामुळे मी हा निर्णय घ्यायचा अखेर ठरवलं.
सर्वात जास्त पगार घेणारे CEO राजेश गोपीनाथन यांनी TCS ला ठोकला रामराम, राजीनाम्याने खळबळगोपीनाथन यांच्या राजीनाम्यावर टीसीएसचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, “मी गेली २५ वर्षे राजेशसोबत काम करत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. गेल्या ६ वर्षांत राजेशने भक्कम नेतृत्व दिले आहे.
कोण आहेत गोपीनाथन? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद येथून व्यवस्थापनामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदविका घेतली. गोपीनाथ 2001 पासून TCS शी संबंधित होते. त्यांना फेब्रुवारी 2013 मध्ये कंपनीचे सीईओ पद बहाल करण्यात आले होते. त्यांनी आरईसी त्रिचूरपल्ली येथून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेतली होती.