मराठी बातम्या /बातम्या /मनी /

UPI पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास तात्काळ मदत मिळणार, बँकेला फोन करण्याचीही गरज नाही

UPI पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास तात्काळ मदत मिळणार, बँकेला फोन करण्याचीही गरज नाही

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा NPCI UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिजॉल्युशन सिस्टम तयार करण्यावर काम करत आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा NPCI UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिजॉल्युशन सिस्टम तयार करण्यावर काम करत आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा NPCI UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिजॉल्युशन सिस्टम तयार करण्यावर काम करत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 5 जून : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरलेला डिजिटल पेमेंट मोड (Digital Payment) म्हणून उदयास आला आहे. काही वेळा पेमेंट अयशस्वी (Payment Unsuccessful) झाल्यामुळे UPI यूजर्स नाराज होतात. आता अशा यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा NPCI UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिजॉल्युशन सिस्टम तयार करण्यावर काम करत आहे.

सप्टेंबर 2022 पर्यंत रिझोल्यूशन सिस्टम कार्यान्वित होईल

हिंदूबिझनेसलाइनच्या अहवालानुसार, एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आसबे यांनी सांगितले की, ही प्रणाली सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यान्वित होईल. अॅपमधील फीचर्ससह सुमारे 80-90 टक्के पेमेंट फेल्युअर रिअल टाइममध्ये सोडवले जाण्याची अपेक्षा आहे. IMF-सिंगापूर प्रादेशिक प्रशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये, आसबे म्हणाले की, आम्ही ऑनलाइन डिस्पुट रिजॉल्युशनवर काम करत आहोत. पुढील तीन महिन्यांत, UPI इकोसिस्टममधील 80-90 टक्के डिस्प्युट ऑनलाइन सोडवले जातील.

RBI च्या नावाने तुम्हालाही हा मेसेज आलाय का? स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

बँकेला कॉल करण्याची गरज नाही

पुढे ते म्हणाले की, पुढील 3 महिन्यांत ग्राहकांना बँकेत कॉल करण्याची किंवा कुठेही जाण्याची गरज भासणार नाही, फक्त तुमच्या अॅपवर UPI ची मदत घ्या आणि प्रॉब्लेम रिअल टाइममध्ये सोडवला जाईल. कमीतकमी 90% UPI प्रॉब्लेम्स रिअल टाइममध्ये सोडवले जातील.

Investment Tips: FD चे केवळ फायदे नाही तोटे देखील आहेत; समजून घ्या मग गुंतवणूक करा

UPI म्हणजे काय?

UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे तुम्ही UPI द्वारे पैसे कधीही, रात्री किंवा दिवसा ट्रान्सफर करू शकता.

पैसे ट्रान्सफरची UPI सिस्टम कशी कार्य करते?

हे फीचर वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Paytm, Phonepe, Google Pay, BHIM इत्यादी कोणतेही UPI अॅप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही तुमचे बँक खाते UPI अॅपशी लिंक करून ही सिस्टम वापरू शकता. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते एकाधिक UPI अॅप्सशी लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात.

विशेष बाब म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू देते. हजारो फीचर फोन यूजर्सना डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये आणण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडे UPI 123Pay चं नवीन व्हर्जन सादर केलं आहे.

First published:

Tags: Money, Online payments, Upi