मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Post Office Scheme: पैसे सुरक्षित आणि व्याजदरही जास्त; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक

Post Office Scheme: पैसे सुरक्षित आणि व्याजदरही जास्त; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक

चांगला परतावा देणाऱ्या या योजनांमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTD) आणि किसान विकास पत्र (KVP) यांचा समावेश आहे. गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनांबद्दल अशी सर्व माहिती जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  मुंबई, 5 जून : भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आजपासून गुंतवणूक गरजेची आहे. मात्र अनेकांना गुंतवणूक कुठे करावी हेच समजत नाही. त्यामुळे तुम्ही देखील जर बचतीसाठी कोणतेही नवीन नियोजन करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची खास बचत योजना (Post Office Schemes) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनांद्वारे दरमहा चांगले उत्पन्नही मिळते. या योजनांमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTD) आणि किसान विकास पत्र (KVP) यांचा समावेश आहे. गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनांबद्दल अशी सर्व माहिती जाणून घेऊया. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (National Saving Certificate) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मधील गुंतवणुकीवर दरवर्षी 6.8 टक्के व्याज मिळते. तसेच, व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. त्याच वेळी, गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच व्याजाची रक्कम दिली जाते. या योजनेत किमान एक हजार रुपये गुंतवले जाऊ शकतात. योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसच्या NSC योजनेंतर्गत एकूण गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांचा आहे. इंडिया पोस्टनुसार, या योजनेंतर्गत खाते किमान 100 रुपयांमध्ये उघडता येते. UPI पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास तात्काळ मदत मिळणार, बँकेला फोन करण्याचीही गरज नाही पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट (Post Office Term Deposit) बँकेप्रमाणे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही एफडी करू शकता. ही योजना टर्म डिपॉझिटच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षे पैसे जमा करता येतात. फायदा असा आहे की येथे एफडीवरील व्याजदर बँकेपेक्षा जास्त आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अंतर्गत, 5 वर्षांच्या ठेवींवर 6.7 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिस मुदत ठेव खाते (Post Office FD Account) देखील रोख किंवा चेकद्वारे व्यक्ती सहजपणे उघडू शकते. RBI च्या नावाने तुम्हालाही हा मेसेज आलाय का? स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी काय कराल? किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) तुम्हाला तुमची गुंतवणूक रक्कम दुप्पट करायची असेल, तर KVP हा सर्वोत्तम पर्याय आहे. इतर लहान बचत योजनांच्या व्याजदरांबाबत बोलायचे तर सरकार दर तिमाहीत त्यांचा आढावा घेते. अशा प्रकारे गुंतवलेले पैसे कधी दुप्पट होतील हे व्याजदरांवर अवलंबून असते. FY 2021 च्या पहिल्या तिमाहीत KVP साठी व्याज दर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. येथे तुमची गुंतवणूक 124 महिन्यांत दुप्पट होईल. जर तुम्ही एक लाख रुपये एकरकमी गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. ही योजना आयकर कायदा 80C अंतर्गत येत नाही. त्यामुळे जो काही परतावा येईल, त्यावर कर आकारला जाईल. मात्र, या योजनेत टीडीएस कापला जात नाही.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Investment, Money, Post office

  पुढील बातम्या