मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता सोनं आणायला दुबईत जावं लागतंय वाटतं, पाहा किती स्वस्त?

आता सोनं आणायला दुबईत जावं लागतंय वाटतं, पाहा किती स्वस्त?

भारतापेक्षा दुबई आणि UAE मध्ये सर्वात स्वस्त सोनं मिळतं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

भारतापेक्षा दुबई आणि UAE मध्ये सर्वात स्वस्त सोनं मिळतं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

भारतापेक्षा दुबई आणि UAE मध्ये सर्वात स्वस्त सोनं मिळतं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या दीड वर्षात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. सोनं परवडतं नाही अशी परिस्थिती झाली आहे. 2023 च्या सुरुवातीपासून सोन्याचे दर वाढतच आहेत. आता तर गुढीपाडव्याआधी सोनं साठी पार करतं की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

एक रंजक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? भारतात सोन्यात सर्वात जास्त गुंतवणूक केली जाते. मग दागिने असो किंवा कॉईन असो. आर्थिक अडचण किंवा अडीनडीला उपयोगी पडेल या हिशोबानं का होईना लोकांचा कल हा सोनं खरेदी करण्याकडे असतो. विशेष: सणवार आले की छोटं का होईना सोन्याचं काहीतरी घेतलंच जातं.

सर्वात जास्त सोनं खरेदी करणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. याशिवाय भारतात सोन्याची मोठ्या प्रमाणावर आयातही केली जाते. पण भारतापेक्षा दुबई आणि UAE मध्ये सर्वात स्वस्त सोनं मिळतं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

Gold Rate Today : श्रीमंत करणार सोनं! जुलैपर्यंत होऊ शकतं इतकं महाग, पाहा काय म्हणतात तज्ज्ञ

दुबईमध्ये तुम्ही जर गेलात तर तिथे तुम्हाला भारतापेक्षा 5-6 हजार रुपयांचा फरक पडतो. अर्थात तुम्ही इथे 24 कॅरेट सोनं घेतलं तर हा फायदा आहे. मात्र दागिने घेतलेत तर मात्र तुम्हाला 7 टक्के मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. तिथली मजुरी ही जास्त आहे त्यामुळे दागिने खरेदी करणं तुलनेनं थोडं महाग पडतं असं म्हणायला हरकत नाही.

तुम्ही दुबईहून किती सोनं आणू शकता?

महिला आपल्यासोबत दुबईहून 40 ग्रॅम सोनं सोनं आणू शकतात तर पुरुष आपल्या सोबत 20 ग्रॅमपर्यंत सोनं आणू शकतात. त्यापेक्षा जास्त सोनं जर आणलं 36 टक्के ड्युटी चार्ज भरावा लागतो. जर तुम्ही सोन्याचे दागिने घेतले तर तुम्ही 1 किलोपर्यंतच भारतात दुबईहून आणू शकता.

सोनं विक्री अन् खरेदीसाठीही असते योग्य वेळ, जाणून घ्या कसा होतो फायदा

भारताच्या तुलनेत दुबईमध्ये सोनं 15 टक्क्यांनी स्वस्त आहे. जर भारतात 60 हजार रुपये प्रति तोळा सोनं आहे तर दुबईमध्ये 54 हजार रुपये किंमत आहे. मात्र तिथे ज्वेलरीवर मेकिंग चार्जेस जास्त लावले जातात. त्यामुळे तुम्ही जर दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मात्र तुमच्या खिशाला जास्त कात्री लागू शकते.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today