सोनं ऑल टाईम हाय रेटवर आहे. गेल्या 11 महिन्यातील सर्वोच्च दर सोन्याने गाठला आहे. सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. ऐन लग्नसराईत सोनं महाग झालं आहे.
2/ 9
भारतातच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये देखील सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. तिथला रेकॉर्ड देखील आज मोडला आहे.
3/ 9
एकीकडे बँका बुडत आहे जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचं सावट आहे. क्रूड ऑईलचे भाव कमी होत आहेत आणि त्यात सोन्याचे दर वाढत आहेत.
4/ 9
गुढीपाडव्याआधी सोन्यामध्ये दमदार उसळी पाहायला मिळाली आहे. मागच्या आठवड्यात 10 ग्रॅम सोनं 5 हजार रुपयांनी महाग झाल्याचं पाहायला मिळालं.
5/ 9
एका आठवड्यात सोन्याच्या दरामध्ये 7.5 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली आहे.
6/ 9
बुधवारी पुन्हा एकदा US फेडरल बँकेची बैठक होणार असून पुन्हा एकदा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
7/ 9
रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम, वाढती महागाई आणि जागतिक बाजारपेठेतील संकेत याला कारणीभूत असले तरी सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्यात पैसे गुंतवत आहेत.
8/ 9
दुसरीकडे अमेरिका आणि युरोपमध्ये बँकिंग क्षेत्रात मोठं संकट आलं आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात याचे काय परिणाम होतील ते येत्या काळात पाहावं लागणार आहे.
9/ 9
जून जुलै महिन्यात सोन्याच्या दरात आणखी तेजी पाहायला मिळू शकते असे संकेत आहेत. साधारण 63 हजारापर्यंत सोनं जाऊ शकतं असं काही तज्ज्ञांचं मत आहे.