मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Rate : 60 हजारपेक्षा महाग होऊ शकतं सोनं, रॉकेटच्या स्पीडनं का वाढतोय दर? समोर आलं कारण

Gold Rate : 60 हजारपेक्षा महाग होऊ शकतं सोनं, रॉकेटच्या स्पीडनं का वाढतोय दर? समोर आलं कारण

सोन्याचे दर GST धरून 57 हजारवर पोहोचले आहेत. तर GST सोडून 56 हजारच्या जवळपास आहेत.

सोन्याचे दर GST धरून 57 हजारवर पोहोचले आहेत. तर GST सोडून 56 हजारच्या जवळपास आहेत.

सोन्याचे दर GST धरून 57 हजारवर पोहोचले आहेत. तर GST सोडून 56 हजारच्या जवळपास आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : लग्नसराईच्या निमित्ताने तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण नव्या वर्षात सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर GST धरून 57 हजारवर पोहोचले आहेत. तर GST सोडून 56 हजारच्या जवळपास आहेत.

यावर्षी 2023 मध्ये सोन्याचा भाव 60, 000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. गेल्या 5 वर्षात सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्यामागे काय कारणं आहे हे जाणून घेऊया.

कोरोना काळात 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार पार गेले होते. मात्र हा रेकॉर्ड या वर्षी तोडला जाणार का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 5 जानेवारीपर्यंत सोन्याचे दर वाढतच होते. शुक्रवारी सोन्याचे दर खाली आले आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते सोन्याचे दर सध्या 2 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहेत. चांदीचा भावही 70 हजार रुपयांच्यावर आहे.

बापरे! एकेकाळी फक्त 44 रुपयांना मिळायचं सोनं, अन् आजचे भाव ऐकून येईळ भोवळ

डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सतत बदलत आहे. कधी 81 तर कधी 83 रुपये असं मूल्य होत असल्याने त्याचा परिणाम सोन्यावर होत आहे. एवढंच नाही तर भारतातील आयात कर वाढवला आहे. त्यामुळे सोन्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे फेड पॉलिसी रेट हे एक कारण आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे म्हणणे आहे की, सन २०२३ मध्ये पॉलिसी रेटमध्ये झालेली वाढ मागील वर्ष २०२२ च्या तुलनेत कमी झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्याने एक चांगला आधार मिळाला आहे.

रशिया युक्रेन युद्धामुळे देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मंदीचं सावट आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने किंमती वाढत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहेत. त्यात कोरोनामुळे रखडलेली लग्न आता होत आहेत. त्यामुळे या दोन वर्षात लग्नसराईसाठी सोनं खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Budget 2023 नंतर स्वस्त होणार सोनं?

जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची मागणी वाढली असून, मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे. यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

भारतात फेब्रुवारी महिन्यात शादीयांचे युग सुरू होईल. ज्यामुळे बाजारात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. भारतात देशांतर्गत मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

चीनमध्ये पुन्हा कोविडचा कहर सुरू झाला असला तरी चीनमध्ये न्यू इयर फेस्टिव्ह सीझनला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे सोन्याची मागणी वाढू लागली आहे. चीन हा सोन्याचा जगातील सर्वात मोठा आयात करणारा देश आहे. त्यामुळे खूप जास्त प्रमाणात सोनं तिथे जात आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today