मुंबई: नव्या वर्षाची सुरुवात दणक्यात झाली खरी त्यासोबत महागाईचा चांगलाच दणका सर्वसामान्य लोकांना बसला आहे. गेल्या 5 वर्षात महागाई गगनाला भिडली आहे. त्यामध्ये वाढणाऱ्या सोन्याचे भाव म्हणजे तर विचारायलाच नकोत अशी अवस्था झाली आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनातील रेकॉर्डही जानेवारीत ब्रेक होतो का अशी चिंता आता आहे. सोन्याचे दर आता 57 हजारांच्या जवळपास पोहोचले आहेत. GST वगळून 56 हजाराच्या जवळपास आहेत. रोज सोन्याचे नवे उच्चांक तयार होत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का एक वेळ अशी होती की फक्त 19 रुपयांना हे सोनं मिळत होतं. ते वाढून 44 आणि नंतर 95 पर्यंत पोहोचलं. अगदी एक वेळ अशी होती की अवघ्या 100 रुपयांनाही एक तोळे सोनं मिळत होतं. आज जर एक तोळे सोन्याचा भाव पाहिला तर फक्त भोवळ यायची बाकी राहील. इतक्या वेगानं हे सोन्याचे दर वाढत आहेत. गेल्या वर्षा जवळपास सोनं 51,300 होत आता तेच वाढून 55 हजारपर्यंत पोहोचलं आहे. दोन वर्षात 3 हजारने तर तीन वर्षात दुप्पट 6 हजारने सोनं वाढत असल्याचं दिसत आहे. 1926 रोजी सोन्याचे दर 18.43 रुपये होते. साधारण 1940 पर्यंत हे दर वाढून 36.04 रुपयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर हे दर वाढून 1950 पर्यंत 99 रुपये हे सोनं होतं. 1980 मध्ये साधारण हा दर वाढून 1330 वर पोहोचला होता. 2000 रोजी सोन्याचे दर ४४०० रुपये सोन्याचे दर पोहोचले होते. २०१० मध्ये सोनं १८५०० रुपये सोन्यासाठी पैसे मोजावे लागत होते. आता मात्र यामध्ये तीनपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 2019 मध्ये सोनं 40 हजार होतं, आता हेच दर 55 हजारवर पोहोचले आहेत.
गोल्ड रिटर्नने दिलेल्या अहवालानुसार
वर्ष | 24 कॅरेट सोन्याचे दर |
---|---|
10 दिवस | 54,860 |
3 महिने | 54,507 |
1 वर्ष | 51,686 |
2 वर्ष | 49,478 |
3 वर्ष | 48,717 |
4 वर्ष | 45,824 |
5 वर्ष | 43,359 |