जाहिरात
मराठी बातम्या / मनी / New Year ला मिळणार मोठं गिफ्ट, Budget 2023 नंतर स्वस्त होणार सोनं?

New Year ला मिळणार मोठं गिफ्ट, Budget 2023 नंतर स्वस्त होणार सोनं?

New Year ला मिळणार मोठं गिफ्ट, Budget 2023 नंतर स्वस्त होणार सोनं?

या बजेटआधी महागाई, इन्कम टॅक्सच्या दरातील बदलांसह अनेक मुद्द्यांवर सरकारकडून महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: लग्नसराईत सोन्याची मागणी वाढली आहे. त्याच दरम्यान वेगाने सोन्याचे दरही वाढत आहेत. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि म्हणूनच आज सोन्याच्या किंमतीवर व्हॅट असेल तर बजेटनंतर तुमची प्रतीक्षा संपू शकते, कारण कॉमर्स मिनिस्ट्रीने 2023 च्या बजेटमध्ये सोन्यावरील आयात शुल्क म्हणजेच निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. अर्थमंत्रालय अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेऊ शकते. या बजेटआधी महागाई, इन्कम टॅक्सच्या दरातील बदलांसह अनेक मुद्द्यांवर सरकारकडून महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात. त्यामुळे या बजेटकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की, यामुळे देशातील निर्यातीला चालना मिळेल तसेच रत्ने आणि दागिन्यांच्या उत्पादनात वाढ होईल. केंद्र सरकारने जुलै महिन्यात सोन्यावरील आयात शुल्क 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के केले होते. चालू खात्यावरील तूट कमी व्हावी आणि सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा बसावा, या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले होते.

New Year : 1 जानेवारीआधी करून घ्या ही 4 कामं, नाहीतर होईल पश्चाताप

याशिवाय निर्यात वाढवण्यासाठी इतर उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे. रत्ने आणि दागिन्यांची निर्यात करणाऱ्यांनी बऱ्याच काळापासून आयात शुल्क कमी करण्याची मागणी करीत आहेत. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिलचे (जीजेईपीसी) माजी अध्यक्ष कॉलिन शाह म्हणाले की, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात निर्यात प्रोत्साहन उपायांची घोषणा करण्याची उद्योगांना आशा आहे. “सोन्यावरील आयात शुल्क कमी करणे आणि दागिन्यांसाठी प्रगतीशील दुरुस्ती धोरणामुळे या क्षेत्राला मोठा फायदा होईल. कच्च्या हिऱ्यांवरील कर आणि प्रयोगशाळेत हिरे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हिऱ्यावरील शुल्क काढून टाकले जाईल.”

New Year ला मिळालेल्या गिफ्टवर किती लागणार TAX? वाचा नियम
News18लोकमत
News18लोकमत

या आर्थिक वर्षात एप्रिल-नोव्हेंबर या काळात भारतातील रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 2 टक्क्यांनी वाढून 26.45 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सोन्याची आयात 18.13 टक्क्यांनी घटून 27.21अब्ज डॉलरवर आली आहे. सोन्याची आयात कमी झाल्याने चालू खात्यावरील तूट कमी होण्यास मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात