Home /News /money /

तुम्हालाही प्रश्न पडत असेल हस्तिदंत एवढे महाग का असतात? काय आहे कारण....

तुम्हालाही प्रश्न पडत असेल हस्तिदंत एवढे महाग का असतात? काय आहे कारण....

हस्तिदंतापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू आजकाल सहज उपलब्ध होत नाहीत. त्या एकतर संग्रहालयांमध्ये पहायला मिळतात, किंवा मग विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात.

    मुंबई, 22 जून : हस्तिदंत, म्हणजेच हत्तीचे दात (Elephant Teeth) हे भरपूर मौल्यवान असतात हे तुम्हाला माहितीच असेल. हत्तींच्या दातांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. हस्तिदंतापासून तयार केलेल्या वस्तूंची अगदी लाखो रुपयांमध्ये (Elephant Teeth price) विक्री होते. मात्र, हस्तिदंतामध्ये असं काय असतं की त्यांची किंमत एवढी होते? याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. किती असते हस्तिदंताची किंमत? हस्तिदंताचा ठराविक असा दर नसतो. कोणत्या भागातील वा कोणत्या जातीचा हत्ती आहे त्यानुसार ही किंमत बदलते. काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये टाकलेल्या एका छाप्यात 17 किलो हस्तिदंत जप्त करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात (Elephant Teeth price in International Market) यांची किंमत सुमारे 1 कोटी 70 लाख रुपये एवढी होती. म्हणजेच, एक किलो हस्तिदंताची किंमत ही सुमारे 10 लाख असल्याचं लक्षात येईल. इन्शुरन्सचा प्रीमियम हप्त्यांमध्ये भरता येणार; काय आहे IRDAI ची योजना? वैज्ञानिक दृष्टिकोनातून काहीच किंमत नाही हस्तिदंतापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू आजकाल सहज उपलब्ध होत नाहीत. त्या एकतर संग्रहालयांमध्ये पहायला मिळतात, किंवा मग विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे हस्तिदंतामध्ये काहीही विशेष घटक (Why Elephant teeth are special) नसतात. जसे इतर कोणा प्राण्याचे दात असतात, तसेच ते हत्तींचे दात असतात. या दातांमध्ये कोणतेही औषधी गुणधर्मदेखील (Are Elephant teeth medically beneficial) नसतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, या दातांचं मूल्य अगदीच नगण्य आहे. मग अशी कोणती गोष्ट आहे जी या दातांचं मूल्य (What makes Elephant teeth expensive) वाढवते? केवळ स्टेटस सिम्बॉल असल्यामुळे महाग हस्तिदंताला एवढी किंमत असण्याचं एकमेव कारण म्हणजे, स्टेटस सिम्बॉल. जुन्या काळापासून राजे-महाराजे हस्तिदंतांपासून तयार केलेल्या वस्तू वापरत आहेत. त्यामुळे हस्तिदंताला मौल्यवान दर्जा (Elephant Teeth status symbol) प्राप्त झाला. हळूहळू हस्तिदंतांकडे श्रीमंतीचं प्रतीक म्हणून पाहिलं जाऊ लागलं. सोबतच, हस्तिदंतांना असलेलं सांस्कृतिक मूल्यही (Elephant teeth cultural value) अधिक आहे. हिंदू धर्मात हत्ती पूजनीय आहे. याच गोष्टींमुळे हस्तिदंताला एवढी किंमत मिळते. खिशाला लागणार कात्री? घरगुती गॅसपासून मालमत्तेपर्यंत येत्या 10 दिवसात बदलणार 'हे' 5 नियम हत्तींच्या काही विशिष्ट प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या दातांची किंमत अधिक मानली जाते. हत्तींचे दात काढण्यास मनाई असल्यामुळे, या दातांची तस्करीदेखील मोठ्या प्रमाणात होते. तसंच, या दातांसाठी हत्तींची मोठ्या प्रमाणात शिकारही करण्याचे प्रकार समोर येतात. हत्तींच्या दातांव्यतिरिक्त गेंड्यांच्या शिंगांचीदेखील तस्करी होण्याचे प्रकार समोर येत असतात.
    First published:

    Tags: Elephant, Money

    पुढील बातम्या