Home /News /money /

इन्शुरन्सचा प्रीमियम हप्त्यांमध्ये भरता येणार; काय आहे IRDAI ची योजना?

इन्शुरन्सचा प्रीमियम हप्त्यांमध्ये भरता येणार; काय आहे IRDAI ची योजना?

नवीन सुविधेअंतर्गत, ग्राहक विम्याचे पेमेंट अनेक महिन्यांत विभागू शकतो. म्हणजेच, एकाच वेळी पैसे न भरता ते ईएमआयमध्ये भरता येईल.

    मुंबई, 20 जून : इन्शुरन्स (Insurance) काळाची गरज आहे. कोरोनानंतर इन्शुरन्सची महत्त्वा लोकांना समजलं आहे. त्यामुळे इन्शुरन्स घेण्याकडे कल वाढला आहे. मात्र अनेकजण असे आहेत की ज्यांना इन्शुरन्स घ्यायचा असतो, मात्र त्याची प्रीमियम (Insurance Premium) एकरकमी भरणे त्यांना शक्य होत नाही. म्हणूनच इन्शुरन्स रेग्युलेटर IRDAI एका योजनेवर काम करत आहे, ज्याच्या अंमलबजावणीमुळे विमाधारकांच्या अनेक समस्या दूर होतील. टीव्ही 9 हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अनेक वेळा लोक इच्छा असूनही इन्शुरन्स काढू शकत नाहीत कारण त्याची किंमत खूप जास्त असते. पैसे जोडून विमा घेतला तरी वेळेवर प्रीमियम भरावा लागतो. प्रीमियम भरण्यास उशीर झाल्यास दंड भरावा लागतो. या सर्व समस्या लक्षात घेऊन IRDA ने एक नवीन योजना तयार केली आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास, ग्राहक किरकोळ आणि कॉर्पोरेट विमा खरेदीसाठी कर्ज घेऊ शकतील. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी दूर होईल. यामुळे इन्शुरन्स प्रीमियम भरण्यासाठी EMI सुविधा उपलब्ध असेल. Edible Oil Prices: महागाईत सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या किमतीत कपात सरकार आणि कंपन्यांच्या प्रयत्नांनंतरही देशात विम्याची व्याप्ती वाढत नसल्याने ही योजना आणली जात आहे. अधिकाधिक लोक विम्याच्या कक्षेत यावेत, अशी सरकारची इच्छा आहे, परंतु हा प्रयत्न फलदायी ठरत नाही. याला सामोरे जाण्यासाठी कर्ज आणि ईएमआयचे नियोजन केले जात आहे. या नवीन सुविधेअंतर्गत, ग्राहक विम्याचे पेमेंट अनेक महिन्यांत विभागू शकतो. म्हणजेच, एकाच वेळी पैसे न भरता ते ईएमआयमध्ये भरता येईल. सरकारच्या SGB स्कीमद्वारे आजपासून स्वस्त सोनं खरेदीची संधी, गुंतवणूक कशी करावी? पॉलिसी घेण्यापूर्वी ग्राहकाला संपूर्ण रक्कम एकरकमी भरण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्याकडे पॉलिसी घेण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही फायनान्स करू शकता. यासाठी वित्त कंपनी विमा कंपनीला प्रीमियमची रक्कम भरणार आहे. नंतर फायनान्स कंपनी ग्राहकाकडून विम्याचे पैसे ईएमआयमध्ये घेऊ शकेल. जर ग्राहकाने विम्याचे पैसे दिले नाहीत, कोणत्याही प्रकारची चूक केली, तर विमा कंपनी फायनान्सरला कर्जाची रक्कम परत करेल. फायनान्सची सुविधा सुरू झाल्यामुळे अधिकाधिक लोक विमा घेऊ शकतील. यासोबतच देशात फायनान्सची बाजारपेठही वाढेल, त्यामुळे कंपन्या त्यांचे कामकाज वाढवतील. याची अंमलबजावणी करण्यासाठी विमा कायद्यात बदल करावा लागणार आहे. त्यासाठी सरकारची संमतीही आवश्यक असेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Insurance, Money

    पुढील बातम्या