मुंबई: एखादा कर्मचारी 5 वर्षांपेक्षा जास्त काळ कंपनीत राहिला तर त्याला ग्रॅच्युटी मिळते अशी बरीच चर्चा ऑफिसमध्ये आपल्या आजूबाजूला ऐकायला मिळत असतात. काही जण म्हणतात की ग्रॅच्युटी मिळण्यापर्यंत नोकरी करावी लवकर नोकरी सोडू नये. मग नेमका प्रश्न हा पडतो की लवकर नोकरी सोडणं तोट्याचं ठरतं का? ग्रॅच्युटी नक्की कशी मिळते किती रक्कम मिळते. याबाबत सविस्तर माहिती सोप्या शब्दात जाणून घेऊया.
अनेकदा लोकांना असा विश्वास असतो की 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्यांना ग्रॅच्युइटी मिळेल. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला 5 वर्षांपूर्वी ग्रॅच्युइटीचा हक्क आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीत 4 वर्ष 240 दिवस काम केले असेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटीचा हक्क आहे. कोळसा किंवा इतर खाणी किंवा भूमिगत प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्यांसाठी 4 वर्ष 190 दिवस पूर्ण झाल्यानंतरच 5 वर्षांचा कालावधी मानला जातो.
या कालावधीनंतर कंपनी सोडली किंवा नोकरीतून निवृत्त झालात, तरीही ग्रॅच्युइटी मिळेल आणि कंपनी ती नाकारू शकत नाही. नोकरीदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर कितीही दिवस कंपनीत काम केले तरी त्याला ग्रॅच्युइटीचा पूर्ण हक्क आहे.
ज्या कंपनीत 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्याच कंपनीत तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळेल, हे लक्षात ठेवा. याचा तपशील ग्रॅच्युइटी पेमेंट अॅक्ट 1972 अंतर्गत देण्यात आला आहे. आजकाल लोक अनेक कारणांमुळे खूप लवकर नोकरी बदलतात.
व्यावसायिकांनी GST रजिस्टेशन कधी अन् कसं करावं? वाचा संपूर्ण डिटेल्स
अनेक जण कामाच्या वातावरणामुळे नाराज असतात, तर अनेक जण चांगल्या संधी आणि पगारासाठी कंपनी सोडून जातात. पहिल्या 1-2 वर्षांत जरी तुम्ही हे केलंत तरी तुम्हाला तितकासा त्रास होत नाही. जर तुम्ही चौथ्या वर्षानंतर कंपनी सोडत असाल तर तुमचं मोठं नुकसान होईल.
कंपनी आपल्या पगारातून ग्रॅच्युइटीचा काही भाग कापते. याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा एक भाग 4 वर्षांसाठी जमा केला जातो. ही रक्कम तुम्ही अचानक सोडून दुसरीकडे जाता तेव्हा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
Gold Rate Today : या जिल्ह्यात मिळतंय सर्वात स्वस्त सोनं, खरेदी करण्याआधी इथे दर चेक करा
ग्रॅच्युटीचं गणित नेमकं काय?
तुमची एकूण सॅलरी x (15/26) x तुम्ही कंपनीत किती वर्ष काम केलं = यावर ग्रॅच्युटीची रक्कम ठरते
तुम्ही 20 वर्ष एक कंपनीत काम केलं. तुमचा पगार 50 हजार रुपये महिना होता. ग्रॅच्युटी मोजताना महिन्यातले 26 दिवस गृहित धरले जातात. 4 दिवस सुट्टी असल्याने ते दिवस पकडले जात नाहीत. तर 15 म्हणजे वर्षात 15 दिवस तुम्हाला ग्रॅच्युटी मिळणार आहे. आता (50,000) x (15/26) x (20) = 5, 76,923 एवढी ग्रॅच्युटी तुम्हाला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Saving bank account