जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ट्रेन वेळापत्रकानुसार उशीरा असल्यास IRCTCकडून 'या' सेवा फ्री मिळतात; चेक करा तुमचे अधिकार

ट्रेन वेळापत्रकानुसार उशीरा असल्यास IRCTCकडून 'या' सेवा फ्री मिळतात; चेक करा तुमचे अधिकार

ट्रेन वेळापत्रकानुसार उशीरा असल्यास IRCTCकडून 'या' सेवा फ्री मिळतात; चेक करा तुमचे अधिकार

ट्रेन उशीरा असल्यास आयआरसीटीसीच्या नियमांनुसार प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. पण ट्रेन किती उशिरा आली तर जेवणाची सोय होईल याबाबत काही नियम आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 सप्टेंबर : विमानाला उशीर झाल्यास संबंधीत विमान कंपनीकडून काही सुविधा प्रवाशांना दिल्या जातात हे अनेकांना माहिती आहे. त्याचप्रमाणे ट्रेनला उशीर झाल्यावरही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे भविष्यात कधीतरी ट्रेन लेट झाली तर तुमचा त्रास कसा कमी होईल? कारण प्रवासी म्हणून तुमचेही काही अधिकार आहेत. ट्रेन लेट असल्यास IRCTC तुम्हाला कोणती सेवा मोफत देते याबाबत माहिती घेऊयात. जर तुमची ट्रेन वेळापत्रकाच्या उशीरा धावत असेल, तर IRCTC तुम्हाला जेवण आणि एक थंड पेय देते. हे जेवण तुम्हाला IRCTC कडून अगदी मोफत दिले जाते. अशा स्थितीत तुम्हाला काहीही विचार करण्याची गरज नाही. तो तुमचा अधिकार आहे. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जेव्हा ट्रेन उशीरा असते तेव्हा प्रवाशांना IRCTC च्या कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

रेल्वे प्रवासात पाच वर्षांखालील मुलांनाही फुल तिकीट काढावं लागणार? रेल्वे मंत्रालयाने म्हटलं…

ही सुविधा कधी उपलब्ध आहे? ट्रेन उशीरा असल्यास आयआरसीटीसीच्या नियमांनुसार प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. पण ट्रेन किती उशिरा आली तर जेवणाची सोय होईल याबाबत काही नियम आहेत. कॅटरिंग पॉलिसीनुसार, ट्रेन दोन तास किंवा त्याहून अधिक उशीर झाल्यास, एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशांना ही सुविधा दिली जाते. म्हणजेच शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा मिळेल.

पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची आता गरज नाही; ‘या’ योजनांमध्ये करा घरबसल्या ऑनलाईन गुंतवणूक

या सुविधा IRCTC द्वारे पुरवल्या जातात पॉलिसीनुसार नाश्त्यामध्ये चहा किंवा कॉफी आणि बिस्किटे, संध्याकाळच्या नाश्त्यात चहा किंवा कॉफी आणि चार ब्रेड स्लाइस, एक बटर पीस दिले जाते. IRCTC कडून प्रवाशांना जेवणही पुरवले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात