मुंबई, 5 सप्टेंबर : देशात डिजिटलायझेशन खूप वेगाने वाढले आहे. अशा परिस्थितीत बँकिंग क्षेत्र, पोस्ट ऑफिस, एलआयसी सारख्या सरकारी संस्थांनी देखील त्यांच्या ग्राहकांना सुलभ आणि यूजर फ्रेंडली सर्व्हिस देण्यासाठी ऑनलाइन सेवा देणे सुरू केले आहे. यामुळे आता नागरिकांना विनाकारण कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच ग्राहकांचे कामही सहज पार पडते. भारतीय पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), किसान विकास पत्र (KVP) यांसारख्या योजनांवर ऑनलाइन सेवा देणे सुरू केले आहे. पोस्ट ऑफिसने एक परिपत्रक जारी केले आहे ज्यात असे म्हटले आहे की, पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट बँकिंगद्वारे, ग्राहकांना किसान विकास पत्र (KVP) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या सुविधांचा सहज लाभ घेता येईल. अशा परिस्थितीत पोस्ट विभागाकडून इंटरनेट बँकिंगची सुविधा घेऊन तुम्ही घरबसल्या तुमचे काम पूर्ण करू शकता. LIC पॉलिसी सरेंडर करण्याआधी नियम समजून घ्या, किती आर्थिक नुकसान होईल? तपासा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC ही पोस्ट ऑफिस बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. सध्या या योजनेवर गुंतवणूकदारांना 6.8 टक्के परतावा मिळत आहे, जो बहुतांश बँक एफडीपेक्षा खूप जास्त आहे. तुम्हाला या योजनेत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम पोस्ट ऑफिसची इंटरनेट बँकिंग सुविधा घ्यावी लागेल. यानंतर तुम्ही घरबसल्या सहजपणे त्याच्या खात्याचा आणि इतर सेवांचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही 5 वर्षांपर्यंत पैसे गुंतवू शकता. Multibagger Stock: केमिकल कंपनीचा स्टॉक बनला रॉकेट! 17 रुपयांचा स्टॉक 3000 रुपयांवर किसान विकास पत्र योजना किसान विकास पत्र ही एक बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही 124 महिन्यांसाठी पैसे गुंतवू शकता. या काळात तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. या योजनेत तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळते. गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसची इंटरनेट बँकिंग सेवा घेतल्यावर तुम्ही किसान विकास पत्र योजनेत सहज पैसे गुंतवू शकता. या योजनेत किमान 1,000 आणि कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.