मराठी बातम्या /बातम्या /मनी /व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब व्हिडिओ, लाइक आणि नंतर स्कॅम! लालसेपोटी व्हाल कंगाल, असा करा बचाव

व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब व्हिडिओ, लाइक आणि नंतर स्कॅम! लालसेपोटी व्हाल कंगाल, असा करा बचाव

पार्टटाइम जॉबच्या नादात व्हाल कंगाल

पार्टटाइम जॉबच्या नादात व्हाल कंगाल

सायबर गुन्हेगार आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून घरी बसून काही मिनिटे काम करून दररोज हजारो रुपये कमावण्याची ऑफर देताय. जो या मॅसेजच्या जाळ्यात अडकतो त्याला मोठं नुकसान भोगावं लागतं.

नवी दिल्ली, 24 मे : आज जवळजवळ प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅप यूझर्स असाल तर तुम्हाला आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होण्याच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढताय. म्हणूनच कोणी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका. कारण व्हॉट्सअ‍ॅपवर मिळालेल्या पैसे कमावण्याच्या ऑफरमुळे तुम्ही कंगाल होऊ शकता.

काय आहे प्रकरण?

व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज पाठवून सायबर गुन्हेगार लोकांना घरी बसून दररोज हजारो रुपये कमावण्याची ऑफर देताय. या मॅसेजसोबतच एक लिंकही पाठवली जातेय. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड केलं जातं. ग्रुपमध्ये व्हिडिओं रिव्ह्यू करणे किंवा त्यांना लाइक करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणात कमाई करण्यासाठी ऑफर केली जातात. याच्या बदल्यात आधी काही फीसही आकारली जाते. काही रुपये घेतल्यानंतर फसवणूक करणारे आपण दिलेल्या रकमेसोबतच आणखी काही पैसे यूझर्सच्या अकाउंटवर टाकतात. यामुळे यूझर्सला फसवणूक करणाऱ्यांवर विश्वास बसतो आणि ते आणखी पैसे टाकतात. नंतर जास्त पैसे जमा झाल्यावर फसवणूक करणारे ते पैसे घेऊन निघून जातात.

प्रॉपर्टी डीलमध्ये किती कॅश भरता येते? एक चूक आणि घरी येईल इन्कम टॅक्सची नोटीस

मेसेजमध्ये काय लिहिले आहे?

इंटरनॅशनल नंबरवरुन पाठवल्या जाणाऱ्या या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसमध्ये खूप आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवल्या जाणाऱ्या अशाच एका मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, 'पार्ट टाइम जॉब उपलब्ध आहे, जी तुम्ही मोबाईल फोनच्या मदतीने घरी बसून करू शकता. यासोबतच तुम्ही दररोज 200 ते 3000 रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 10-30 मिनिटे काम करावं लागेल. नवीन जॉईन होणाऱ्या यूझर्सला 50 रुपये मिळतील. 1 लिहून रिप्लाय करा आणि जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.'

FD वर कुठं मिळतंय जास्त व्याज? या बँका देताय जबरदस्त ऑफर

यूट्यूब व्हिडिओ स्कॅम

इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर स्कॅमर यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी आणि विशिष्ट चॅनेलची सब्सक्राइब करण्यासाठी मोठ्या पैशाची ऑफर देत आहेत. फसवणुकीला बळी पडलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप यूझरने सांगितले की, त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर यूट्यूब व्हिडिओ पाहून पैसे कमवण्याचा मॅसेज आला. लिंकवर क्लिक केल्यावर ते टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले गेले. तेथे त्यांना यूट्यूब व्हिडिओ पाहून पैसे मिळवण्यासाठी आधी गुंतवणूक करण्यास सांगितले. काही रक्कम जमा केल्यानंतर त्याला पुन्हा काम देण्यासाठी पैसे मागण्यात आले. त्याला नोकरी तर मिळाची नाही, पण त्याचा खूप पैसाही वाया गेला.

मूव्हि रेटिंग स्कॅम काय?

काही व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आणि रेटिंग देण्यासाठी मोठ्या पैशांची ऑफर दिली जातेय. अशाच एका मेसेजच्या नावाखाली एका महिलेला लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला. व्हॉट्सअ‍ॅपवर रेस्टॉरंट रेटिंगच्या नावाखालीही लोकांची फसवणूक केली जातेय. पद्धत तीच आहे, फरक एवढाच आहे की रेस्टॉरंटला रेटिंग देऊन घरी बसून भरपूर पैसे कमावण्याची लालूच दिली जातेय. पुण्यातील एका व्हॉट्सअ‍ॅप यूझर्सला या गुन्हेगारांनी तब्बल 7.6 लाखांचा चुना लावला आहे.

First published:
top videos

    Tags: Financial fraud, Fraud, Money fraud, Money18, Online fraud, Scam