नवी दिल्ली, 4 एप्रिल : ATM मधून कॅश काढताना फाटलेल्या नोटा आल्यास काय करायला हवं? याबाबतची माहिती नसल्याने अनेक जण स्वत:चं नुकसानही करुन घेतात. जाणून घ्या अशा परिस्थितीत नेमकं काय कराल? ATM मधून कॅश काढल्यानंतर फाटलेल्या नोटा आल्या, तर काळजी करण्याची गरज नाही. या नोटा सहजपणे बदलता येऊ शकतात. तसंच नोटा बदलून चांगल्या नोटाही घेता येऊ शकतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, ATM मधून आलेल्या फाटलेल्या नोटा बँकतून बदलून दिल्या जातात आणि कोणतीही प्रायव्हेट किंवा सरकारी बँक असं करण्यापासून नकार देऊ शकत नाही.
बँकेत नोट बदलणं काही मिनिटांची प्रोसेस असते. एखादी बँक प्रोसिजरच्या नावाने अधिक काळ वाट बघण्यास सांगत असेल किंवा नोट बदलण्यास नकार देत असेल, तर याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करता येऊ शकते. RBI नुसार, असं करणाऱ्या बँकांवर 10 हजारांचा दंड लागू शकतो.
ज्या बँकेच्या ATM मधून कॅश काढली आहे, त्या बँकेत जा. तेथे एक अर्ज लिहावा लागेल, ज्यात पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि एटीएमचं लोकेशन लिहावं लागेल. त्यानंतर ATM मधून पैसे काढल्यानंतर मिळालेल्या स्लिपची कॉपी अॅप्लिकेशनसह अटॅच करावी लागेल आणि ते बँकेत जमा करावं लागेल. जर ट्रान्झेक्शनची स्लिप नसेल, तर मोबाईलवर आलेल्या ट्रान्झेक्शन्स डिटेलची माहिती द्यावी लागेल.
हा अर्ज जमा केल्यानंतर बँक अधिकारी ग्राहकाच्या अकाउंट्सचे सर्व डिटेल्स वेरिफाय करतील आणि सर्व पडताळणी करुन फाटलेल्या नोटा घेऊन नव्या नोटा देतील. या संपूर्ण प्रोसेससाठी काही मिनिटांचाच वेळ लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM