जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Education Loan घेण्यापूर्वी स्वतःला विचारा हे 4 प्रश्न! होईल फायदाच फायदा

Education Loan घेण्यापूर्वी स्वतःला विचारा हे 4 प्रश्न! होईल फायदाच फायदा

एज्युकेशन लोन

एज्युकेशन लोन

Education Loan Tips : शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक जण एज्युकेशन लोन घेतात. पण हे घेण्यापूर्वी काही गोष्टींचा योग्य विचार केला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जुलै : सध्याच्या काळात शिक्षणाचा खर्च खूप जास्त असतो. सामान्य कुटुंबासाठी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुरेसा फंड गोळा करणे सोपं काम नसतं. त्यामुळेच आता एज्युकेशन लोन घेण्याचे प्रमाण वाढत आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी एज्युकेशन लोन ही पालकांसाठी मोठी मदत झाली आहे. आजकाल प्रत्येक बँक एज्युकेशन लोन देतात.

News18लोकमत
News18लोकमत

शिक्षणासाठी कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. जर घाईघाई तुम्ही पूर्ण पडताळणी न करता लोन घेतलं तर भविष्यात तुम्हाला अडचणींचा समना करावा लागू शकतो. विचार करुन आणि सर्व गोष्टींचा विचार करुन तुम्ही लोन घेतलं तर कर्ज फेडण्यास तुम्हाला सोपं जाईल. यासोबतच तुमच्या पैशांचीही बचत होईल. एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी चार प्रश्न तुम्ही स्वतःला विचारुनच घ्यायला हवीत. ITR Refund स्टेटस दोन प्रकारे ऑनलाइन करता येईल चेक, सोपी आहे प्रोसेस! किती लोन घेतलं पाहिजे? कोणत्याही कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक प्रकारचे खर्च येतात. यामध्ये कोर्स फी, हॉस्‍टल किंवा राहण्याचा खर्च, पुस्तके, लॅपटॉप इत्यादींवर खर्च केलेली रक्कम असते. म्हणूनच कर्ज घेण्यापूर्वी हे सर्व आवश्यक खर्च जोडले पाहिजेत. खर्च न जोडता कर्जासाठी अर्ज करणे समजदारी नाही, कारण पुढील अभ्यासासाठी तुम्हाला पैसे कमी पडू शकतात. रिपेमेंट टेन्योर किती असावा? बँक कोर्सच्या कालावधी व्यतिरिक्त, बँका कर्जाची परतफेड करण्यासाठी एक वर्षाचा अतिरिक्त मोरेटोरियम वेळ देखील देतात. यासोबतच तुम्ही EMI भरणे सुरू करता तेव्हा तुम्हाला 15 वर्षांचा रीपेमेंट पीरियड मिळेल. ज्या दिवशी लोन मिळतं त्या दिवसापासून व्याज सुरु होतं. बँक मोरेटोरियम पीरियड आणखी दोन वर्षे वाढवू शकते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कर्ज घेताना रीपेमेंट पीरियड निवडला पाहिजे. Loan on FD: फिक्स्ड डिपॉझिटवर सहज मिळतं लोन, जाणून घ्या व्याजदर किती किती व्याज द्याव लागेल? एज्युकेशन लोन व्याजदर कोर्स, संस्थान, मागील अकॅडमिक परफॉर्मेंस, विद्यार्थी/सह-अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर आणि सिक्योरिटी यासारख्या घटकांवर अवलंबून असतात. विविध बँका आणि वित्तीय संस्थांच्या व्याजदरातही फरक आहे. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी सर्व बँकांच्या व्याजदराची माहिती योग्य प्रकारे घेतली पाहिजे. कमाई किती असेल? एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी तुम्ही ज्या संस्थेत प्रवेश घेत आहात त्या कोर्स आणि संस्थानचा प्लेसमेंट रेट जाणून घेणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुम्हाला कोर्सनंतर नोकरी मिळेल की आधी मिळेल याची ढोबळ कल्पना येईल. यावरून पगाराचीही कल्पना येईल. प्लेसमेंट आणि पगाराची कल्पना असल्यास मासिक उत्पन्न आणि त्यानुसार ईएमआयचा अंदाज लावण्यास मदत होईल. कर्जाचा कालावधी निवडण्यासाठी भविष्यातील कमाईचा अंदाज देखील खूप उपयुक्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात