Home /News /money /

तुमच्याकडे असलेली 500 रुपयांची नोट नकली तर नाही? व्हायरल मेसेजचं सत्य जाणून घ्या

तुमच्याकडे असलेली 500 रुपयांची नोट नकली तर नाही? व्हायरल मेसेजचं सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटेशी संबंधित एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये तुमच्याकडेही अशी 500 रुपयांची नोट असेल तर तुम्ही सावध राहा, ही नोट बनावट आहे, असे सांगण्यात आले आहे.

    मुंबई,11 मे : एक व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. त्यात 500 रुपयांच्या दोन नोटा (500 rupees note) दाखवण्यात आल्या होत्या. बनावट आणि खरी नोट यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न त्यात केला जात होता. मात्र तुम्ही तो व्हिडीओ (Viral video) पाहिला असेल आणि त्या व्हिडीओत दाखवलेली 500 रुपयांची बनावट नोट (Fake note) तुमच्याकडेही असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटेशी संबंधित एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये तुमच्याकडेही अशी 500 रुपयांची नोट असेल तर तुम्ही सावध राहा, ही नोट बनावट आहे, असे सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये कोणत्या नोटेबद्दल बोलले जात आहे आणि त्यात किती तथ्य आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये 500 रुपयांच्या दोन नोटांमधील फरक स्पष्ट करताना खरी आणि खोटी असं संगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेल्या नोटांमध्ये हिरव्या पट्टीची जागा दाखवून अलर्ट करण्यात आलं आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सरकारही चिंतीत; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितली दर कमी करण्यासाठी काय असेल रणनिती? व्हिडीओ सांगण्यात येत आहे की 500 रुपयांच्या अशा कोणत्याही नोटेमध्ये, ज्यामध्ये आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ हिरवी पट्टी नसून गांधीजींच्या फोटोजवळ असेल, तर ती बनावट आहे. 500 रुपयांची अशी कोणतीही नोट घेऊ नये. पीआयबी फॅक्ट चेक पीआयबीने या व्हिडीओबद्दल ट्वीट केले आणि लिहिले की, व्हिडीओमध्ये अशी चेतावणी दिली जात आहे की 500 रुपयांची अशी कोणतीही नोट घेऊ नये, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या फोटोजवळ आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 500 रुपयांच्या दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत. PNB खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेच्या अनेक सुविधांच्या शुल्कात बदल, चेक करा नवे नियम तुम्हीही करु शकता तक्रार? असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आल्यास, तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही PIB द्वारे फॅक्ट चेक करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडीओ पाठवू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Fake, Video viral

    पुढील बातम्या