मुंबई, 24 मार्च: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नुकताच मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकीच रद्द केलीये. सूरत कोर्टाने मानहानी प्रकरणात गुरुवारी राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर हा मोठा निर्णय लोकसभा सचिवालयाकडून घेण्यात आला. राहुल गांधी हे केरळच्या वायनाडचे खासदार होते. याच पार्श्वभूमीवर आज आपण खासदारांना सॅलरी किती मिळते आणि कोणकोणत्या सुविधा मिळणतात हे जाणून घेणार आहोत. खासदारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहून तर तुम्ही चकीत व्हाल...
देशातील नेत्यांना भरघोस पगारासोबतच अने भत्ते मिळतात. या भत्त्यांविषयी तुम्ही कल्पना देखील करु शकत नाही. एका खासदाराला दरमहा 1 लाख 40 हजार रुपये फिक्स मिळतात. यावर यापेक्षा जास्त भत्ता देखील दिला जातो. फिक्स वेतनामध्ये महिन्याची फिक्स सॅलरी 50, 000 असते. कंस्टीट्यूटेन्सी अलाउंस 45, 000 , ऑफिस अलाउंस 45,000 असतो.
Mutual Fund म्हणजे काय? कशी करावी गुंतवणूक? सर्व प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दात
खासदारांना फिक्स किती सॅलरी मिळते हे आपण पाहिलेय. पण आता याशिवाय कोणकोणते भत्ते मिळतात हे आपण पाहणार आहोत. या भत्त्यांविषयी वाचून सर्वसामान्य चक्रावून जातील. या भत्त्यांची यादीच आज आपण पाहणार आहोत.
-डायरेक्टर एरियर(वार्षिक) : 3 लाख 80 हजार रुपये
-हवाई सफर भत्ता(वार्षिक) : 4 लाख 8 हजार रुपये
-रेल्वे प्रवास भत्ता (वार्षिक) : 5 हजार रुपये
-पाणी भत्ता (वार्षिक) : 4 हजार रुपये
-वीज भत्ता (वार्षिक) : 4 लाख रुपये
Rahul Gandhi : राहुल गांधींना निवडणूक लढवता येणार की नाही? लोकप्रतिनिधी कायदा काय सांगतो
अशा प्रकारच्या अनेक भत्त्यांच्या स्वरुपात खासदारांना पैसे दिले जातात. एका खासदाराच्या सॅलरी व्यक्तिरिती त्यांना जवळपास 1 लाख 51 हजार 833 रुपए प्रतिमहिना म्हणजेच 18 लाख 22 हजार रुपये वार्षिक भत्ता दिला जातो. तर मग खासदारांची एकूण सॅलरी किती झाली? तर एका खासदाराची महिन्याची सॅलरी 2,91,833 रुपये असते. म्हणजेच देशाला खासदाराला वार्षिक 35 लाख रुपये द्यावे लागतात.
महत्त्वाचं म्हणजे खासदारांना त्यांच्या सॅलरीवर कोणताही टॅक्स लागत नाही. तसंच मिळणारे भत्ते देखील अनेक प्रकारचे असतात. ज्यामध्ये अनेक सुविधा त्यांच्या कुटुंबातील लोकांनाही मिळतात. यामध्ये वाइफ किंवा पार्टनरसाठी 34 फ्री हवाई प्रवास, अनलिमिटेड ट्रेनचा प्रवास आणि संसद सत्रादरम्यान घरापासून दिल्लीपर्यंत वार्षिक 8 हवाई सफरचा समावेश आहे.
इतर भत्त्यांविषयी बोलायचं झालं तर खासदारांना 50 हजार यूनिट फ्री वीज, 1 लाख 70 हजार फ्री कॉल्स, 40 लाख लीटर पाणी, राहण्यासाठी सरकारी बंगला(ज्यामध्ये सर्व फर्नीचर आणि एयरकंडीशन आणि त्यांचं मेंटेनेंसही फ्री) असतं. यासोबतच खासदारांना सिक्युरिटी गार्ड्स, आयुष्यभराची पेन्शन, जीवनविमा आणि सरकारकडून खासदारांना मोफत दिली जाणारी गाडी दिली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mp, Parliament, Rahul gandhi