Home /News /money /

Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना बंपर कमाई; 2 रुपयांचा स्टॉक 195 रुपयांवर

Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना बंपर कमाई; 2 रुपयांचा स्टॉक 195 रुपयांवर

गेल्या एका महिन्यात Brightcom Group स्टॉक 108 रुपयांवरून 195.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 80 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत हा मल्टीबॅगर स्टॉक शेअर बाजारात 12.20 रुपयांवरून 195.90 रुपयांवर गेला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 डिसेंबर : शेअर बाजारात पैसे कमवायचे तर संयम देखील खुप महत्त्वाचा असतो. एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर लगेच नफा मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे असते. असा समज घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे ठरु शकते. संयम असेल तर फायदा होतोच हे  हैदराबादस्थित डिजिटल मार्केटिंग कंपनी स्टॉक ब्राइटकॉम ग्रुपने (Brightcom Group) हे सिद्ध केले आहे. गेल्या तीन वर्षांत, हा स्टॉक फक्त 2.16 रुपयांवरुन (Brightcom Group Stock Price) 195.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 9000 टक्के परतावा दिला आहे. नवीन वर्ष सुरू होणार असल्याने, हा मल्टीबॅगर स्टॉक संकेत देत आहे की शेअर बाजारातील गुंतवणूकदार या स्टॉकमध्ये 2022 साठी देखील मल्टीबॅगर स्टॉक म्हणून गुंतवणूक करु शकता. गेल्या एका आठवड्यात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला येऊन 16 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. Star Health Insurance IPO मध्ये गुंतवणूकदारांचं 10 टक्के नुकसान, मात्र राकेश झुनझुनवालांनी कमावले 5418 कोटी महिनाभरात 80 टक्के वाढ गेल्या एका महिन्यात पेनी स्टॉक 108 रुपयांवरून 195.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 80 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत हा मल्टीबॅगर स्टॉक शेअर बाजारात 12.20 रुपयांवरून 195.90 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत या स्टॉकने सुमारे 1500 टक्के वाढ नोंदवली आहे. मुंबईत पुन्हा CNG आणि PNG च्या किंमतीत वाढ; पाहा नवीन दर गेल्या काही वर्षांत, NSE वर लिस्टिंग झालेला हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 7 रुपयांवरून 195.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. ज्यामुळे त्याच्या शेअरहोल्डर्सना सुमारे 2700 टक्के परतावा मिळाला आहे. त्याचप्रमाणे गेल्या एका वर्षात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 4.24 रुपयांवरून 195.90 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे गेल्या एका वर्षात पेनी स्टॉकमध्ये 4500 टक्के वाढ झाली आहे. Brightcom Group च्या शेअर्सची हिस्ट्री पाहता, या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या शेअरची किंमत 4 जानेवारी 2019 रोजी NSE वर 2.16 रुपये होती, जी 17 डिसेंबर 2021 रोजी वाढून 195.90 रुपये झाली. अशाप्रकारे, सुमारे 3 वर्षांच्या कालावधीत या समभागाने आपल्या भागधारकांना 9000 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर त्याचे आज 91 लाख रुपये झाले असते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या