जाहिरात
मराठी बातम्या / मनी / dhanteras 2022 : धनत्रयोदशीला किती कॅरेटचं सोनं घ्यावं? 24, 22, 18 की 14 यात नेमका काय फरक?

dhanteras 2022 : धनत्रयोदशीला किती कॅरेटचं सोनं घ्यावं? 24, 22, 18 की 14 यात नेमका काय फरक?

dhanteras 2022 : धनत्रयोदशीला किती कॅरेटचं सोनं घ्यावं? 24, 22, 18 की 14 यात नेमका काय फरक?

तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही जर जात असाल तर तुम्ही किती कॅरेटचं सोनं घेता ते नीट तपासून घेता का या गोष्टी देखील पाहाणं महत्त्वाचं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Diwali 2022: आज धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोनं-चांदी खरेदी करणं शुभं मानलं जातं. सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून ते मूर्तींपर्यंत किंवा कॉइन देखील घेतले जातात. अशावेळी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही जर जात असाल तर तुम्ही किती कॅरेटचं सोनं घेता ते नीट तपासून घेता का या गोष्टी देखील पाहाणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सोनं घेताना ते कोणत्या उद्देशानं घेताय हे डोक्यात पक्क हवं. दागिने की कॉइन आणि कोणतं सोनं घ्यावं याबद्दल देखील आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कॅरेटनुसार बाजारात सोन्याची विक्री केली जाते. त्याची भावनाही वेगळी आहे. उदाहरणार्थ, २४, २२, १८ आणि १४ कॅरेट. कॅरेट हे शुद्धतेचे वैशिष्ट्य आहे. अशावेळी कोणते सोने खरेदी करावे हे समजून घेणे गरजेचे आहे.

News18

शुद्ध सोनं २४ कॅरेटमध्ये दागिने तयार होत नाहीत. त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. हे सोनं बिस्कीट किंवा कॉइन स्वरुपात येतं. 23 कॅरेट सोन्याचेही दागिने केले जात नाहीत त्याचं शुद्धता थोडी कमी असते.

22, 18, 14 कॅरेटचे दागिने केले जातात. प्रत्येक कॅरेटचे हॉलमार्क वेगळे असतात. उदाहरणार्थ, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875, 18 ला 750 आणि 14 कॅरेटवर 583 असे लिहिलेलं असतं.

…म्हणून आता स्वस्त सोने खरेदीचे युग संपणार का? वाचा, सविस्तर

22 कॅरेट सोन्याची शुद्धता 91.67 असते. त्यामध्ये इतर धातू दागिने तयार करण्यासाठी वापरले जातात. जेवढं नक्षीकाम नाजूक आणि अधिक तेवढे मेकिंग चार्जस जास्त आकारले जातात. उरलेला 8.33 टक्के इतर धातू वापरले जातात.

News18

हे वाचा-दिवाळीपूर्वी तुमचे जुने दागिने दिसतील नव्यासारखे, स्वच्छ करण्याच्या या सोप्या टिप्स पहा
News18लोकमत
News18लोकमत

१८ कॅरेट सोन्यामध्ये ७५ टक्के शुद्धता असते. २५ टक्के दुसरे धातू मिक्स केलेले असतात. यावर 18KT, 18 Carat, 18K असं लिहिलेलं असतं. १४ कॅरेटमध्ये 58.3 टक्के शुद्धता असते. बाकी इतर धातू असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात