जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ...म्हणून आता स्वस्त सोने खरेदीचे युग संपणार का? वाचा, सविस्तर

...म्हणून आता स्वस्त सोने खरेदीचे युग संपणार का? वाचा, सविस्तर

...म्हणून आता स्वस्त सोने खरेदीचे युग संपणार का? वाचा, सविस्तर

भारतातील सर्वाधिक सोने विदेशातून आयात केले जाते.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढील एका वर्षात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. खरं तर, जगभरातील प्रतिनिधी सध्या लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) च्या वार्षिक मेटल कॉन्फरन्समध्ये सहभागी होत आहेत. पोर्तुगालमधील लिस्बन येथे ही बैठक सुरू आहे. या प्रतिनिधींचा अंदाज आहे की पुढील एका वर्षात सोन्याची किंमत 1830.50 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. येत्या वर्षभरात सोन्यात मोठी तेजी येण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या दागिन्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता - सध्या सोन्याचा भाव प्रति औंस 1650 डॉलरच्या जवळ आहे. वर्षभरात केवळ सोन्याचेच नाही तर चांदीचे भाव वाढण्याची शक्यता आहे. या प्रतिनिधींवर विश्वास ठेवला तर पुढील एका वर्षात चांदीची किंमत प्रति औंस 18.70 डॉलरवरून 28.30 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढू शकते. याशिवाय, प्लॅटिनमची किंमत 915 डॉलर ते 1238.70 डॉलरपर्यंत वाढू शकते आणि पॅलेडियमची किंमत 2020 डॉलर ते 2058.80 डॉलरपर्यंत वाढू शकते. देशांतर्गत बाजारावरही परिणाम दिसणार - भारतातील सर्वाधिक सोने विदेशातून आयात केले जाते. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल. लंडन सराफा बाजारात सोन्याची स्पॉट किंमत ठरवली जाते. सोन्याच्या स्पॉट किमतीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीही वाढतात. अशा स्थितीत, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वर्षभरात 1830.50 डॉलर प्रति औंसवर पोहोचली, तर देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. आज डॉलरमध्ये किंचित स्थिरता आल्यानंतर सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. स्पॉट गोल्ड आज 0.1 टक्क्यांनी घसरल्यानंतर 1650.75 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. स्पॉट मार्केटमध्ये चांदीचा भाव 0.2 टक्क्यांनी घसरून 18.71 डॉलर प्रति औंसवर होता. व्याजदरांमध्ये वाढ होण्याची शक्यता - अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हने चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी आर्थिक धोरण कडक करणे सुरूच ठेवल्‍याचे पुन्‍हा सांगितले आहे. मिनियापोलिस फेडचे अध्यक्ष नील काश्करी यांनी मंगळवारी सांगितले की, जर महागाई थांबली नाही तर फेडरल रिझर्व्ह बँकेला व्याजदर 4.75% पेक्षा जास्त वाढवावे लागतील. हेही वाचा -  तुमच्या सॅलरीचाच भाग असतो का बोनस? कोणाला किती द्यावा हे कसं ठरवलं जातं? सामान्यतः, महागाईविरूद्ध बचाव म्हणून सोन्याचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र, व्याजदरात सातत्याने होणाऱ्या वाढीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. मंगळवारी, जगातील सर्वात मोठा गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच SPDR गोल्ड ट्रस्टची होल्डिंग देखील 0.29 टनांनी कमी झाली आहे. रशियन सोने होल्डिंग वाढवणार नाही - रशियन मध्यवर्ती बँकेचा असा विश्वास आहे की, सोने आणि परकीय चलन साठ्यात आपली होल्डिंग वाढवण्याची गरज नाही. रशियाच्या मध्यवर्ती बँकेचे डेप्युटी गव्हर्नर अलेक्सी झाबोटकिन यांनी पाश्चात्य निर्बंधांदरम्यान सोन्याची सरकारी खरेदी वाढविण्याच्या खाण कामगारांच्या विनंत्या नाकारल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात