जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Mutual Funds Tips : SIP म्हणजे काय? कसा मिळतो फायदा

Mutual Funds Tips : SIP म्हणजे काय? कसा मिळतो फायदा

Mutual Funds Tips : SIP म्हणजे काय? कसा मिळतो फायदा

SIP हा म्युच्युअल फंडचा एक भाग आहे. याला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स म्हणून SIP असं म्हटलं जातं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : आपण कमवतो म्हणजे आपली हौस मौज झालीच पाहिजे असं आपलं मत असतं. पण ऐनवेळी किंवा भविष्यात जर आपल्याकडे पैसा नसेल तर आपल्याला खूप मोठा तोटा होऊ शकतो. त्यामुळे अगदी 500 ते 1000 रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. दर महिन्याला हे पैसे तुम्ही SIP मध्ये गुंतवले तर तुम्हाला मोठा फायदा मिळतो. SIP म्हणजे नक्की काय त्याचा कसा फायदा होतो याबाबत जाणून घेऊया. SIP हा म्युच्युअल फंड चा एक भाग आहे. याला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स म्हणून SIP असं म्हटलं जातं. ही एक सोपी प्रक्रिया आहे. यामध्ये तुम्हाला ठरावीक रक्कम दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये टाकायची असते. थोडक्यात RD सारखंच पण त्याचे रिटर्न्स हे शेअर बाजारावर अवलंबून असतात. तुम्ही थेट बँक खात्यातून तुमच्या डिमॅटमध्ये SIP साठी पैसे ऑटो डेबिट होतील असा पर्याय ठेवू शकता. दरवर्षी बँका किंवा काही खासगी कंपन्या या SIP मध्ये योगदान वाढवण्याची परवानगी देतात. तुम्ही कोणती SIP निवडायची तर ते मार्केटमधील रिटर्न्सचे पर्याय पाहून आणि त्या कंपनीची लॉयल्टी आणि आधीचे काही रेकॉर्ड्स चेक करून ठरवायचं आहे.

Money Mantra - अखेर जॉबची प्रतीक्षा संपली; नोकरीच्या आकर्षक ऑफर्स येतील

तुम्ही 500 रुपयांपासून SIP चालू करू शकता. याशिवाय तुमच्या खात्यावर १०० रुपये जास्त असायला हवेत. तुम्ही जास्तीचे पैसे देखील यामध्ये गुंतवू शकता. तुम्ही शॉर्ट टर्म, लाँग टर्म किंवा इक्वीटीपैकी कोणता पर्याय निवडता त्यावर तुम्हाला किती रिटर्न्स मिळणार हे अवलंबून आहे.

News18लोकमत
News18लोकमत
PM Kisan Yojna: पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल का? काय आहेत नियम?

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पैसे बुडण्याची भीती असते. अशावेळी धोका कमी करून चांगला परतावा देण्याचा प्रयत्न बँका किंवा कंपन्या करतात. म्युच्युअल फंडमध्ये सामान्य लोक कमी रकमेपेक्षा कमी जोखीम पत्करून गुंतवणूक सुरू करू शकतात आणि तुमच्या या छोट्या गुंतवणुकीवरही बाजारतज्ज्ञ सतत लक्ष ठेवून असतात, जो आपला परतावा इतरांपेक्षा जास्त ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात