आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (27 ऑक्टोबर 2022) राशिभविष्य मेष (Aries): बिझनेसमन्सची व्यावसायिक कामांमध्ये सक्रियता राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कार्यालयीन कामाला प्राधान्य देतील. मोठा विचार केल्यानं चांगलं यश मिळेल. आर्थिक बाबतीत मनोबल उंचावेल. हुशारीने पैशांचा व्यवहार करा. आवश्यक कृती करण्यापूर्वी सल्ला घ्या. उपाय: गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवा. वृषभ (Taurus): करिअरमध्ये व्यावसायिक ध्येयांना प्राधान्य राहील. संपत्तीमध्ये वाढ होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांचा दिवस सामान्य राहील. व्यवसायातील सकारात्मक घडामोडींमुळे आनंदी राहाल. मौल्यवान भेट मिळेल. तुम्हाला प्रभावी ऑफर मिळतील. उपाय: घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही खा. मिथुन (Gemini): व्यवसायात परिणामकारकता जाणवेल आणि कामं गतीने पूर्ण होतील. नोकरीच्या आकर्षक ऑफर उपलब्ध होतील. व्यावसायिकांच्या संपत्तीत वाढ होईल. व्यापार्यांना नवनिर्मितीत रस असेल. वैयक्तिक कामगिरीवर भर दिला जाईल. स्व-प्रयत्न अधिक चांगले होतील. सुसंवाद वाढेल. उपाय: श्री हनुमान मंदिरात ध्वज दान करा. कर्क (Cancer): बिझनेसमध्ये जोखमीच्या कामात धीर धरा. व्यवहारात घाई करू नका. पगारदार व्यक्ती प्रोफेशनल लोकांचा विश्वास जिंकतील. दूरच्या व्यक्तींशी किंवा परदेशाशी संबंधित काही प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतील. उत्पन्न सामान्य स्थितीपेक्षा चांगलं राहील. कामाच्या विस्ताराची संधी मिळेल. दिखाऊपणाला बळी पडू नका. इच्छित वस्तूची खरेदी शक्य आहे, परंतु त्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च होईल. उपाय: श्री महालक्ष्मीदेवीला खिरीचा नैवेद्य दाखवा. सिंह (Leo): कामात स्पर्धेची भावना राहील. नवीन संधींमध्ये वाढ होईल. जमीन मालमत्तेच्या बाबतीत मोह टाळा. ऑफिसमधील कामात उत्साहाने सहभागी व्हाल. तरुणांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. महत्त्वाची काँन्ट्रॅक्ट तुमच्या पदरात पडतील. महत्त्वाची प्रकरणं हाताळली जातील. पद-प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल. उपाय: ॐ सूर्याय नम: मंत्राचा 108 वेळा जप करा. कन्या (Virgo): ऑफिसमधील सहकारी तुम्हाला प्रत्येक बाबतीत साथ देतील. उत्पन्न चांगलं राहील. तुमची क्षमता आणि कामगिरी पाहून सर्वजण प्रभावित होतील. व्यापार्यांना महत्त्वाच्या कामात अपेक्षित ऑफर मिळतील. जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. टारगेटवर लक्ष केंद्रित करा. मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये सुधारणा होईल. चर्चेतून योग्य निष्कर्ष निघेल. सर्व्हिसशी संबंधित गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे पार पडतील. उपाय: लहान मुलींना अभ्यासाची साधनं द्या. तूळ (Libra): नोकरी व्यवसायाशी संबंधित योजनांना गती मिळेल. जोडीदाराशी जुळवून घेणं अवघड होईल. धोरणात्मक नियमांचं पालन कराल. उद्योग व्यवसायात प्रभाव कायम राहील. तुमच्या चोहोबाजूला चांगल्या गोष्टींची चर्चा होईल. महत्त्वाची कामं सहजतेने कराल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. व्यावसायिक बाबी अनुकूल होतील. उपाय: ज्येष्ठांचा आदर करा. वृश्चिक (Scorpio): अरेंजमेंट्सवर लक्ष केंद्रित करा. व्यावसायिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. करिअर व्यवसायात संमिश्र परिस्थिती राहील. अत्यावश्यक कामांची यादी तयार करा. वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा. बजेटनुसार खर्च करा. एकूण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा. धूर्त व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. नवीन लोकांपासून लांब रहा. उपाय: पालकांची सेवा करा. धनू (Sagittarius): उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. स्थिरतेमध्ये वाढ होईल. चर्चेतून अपेक्षित निष्कर्ष निघेल. व्यापार उद्योग मजबूत होईल. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायाची स्थिती चांगली होईल. ध्येयासाठी प्रमाणिकपणे कष्ट करा. जोखीम पत्करण्याची तयारी असेल. आर्थिक व्यवहारांमध्ये गती वाढवा. नफा आणि प्रभावामध्ये वाढ होईल. उपाय: विष्णुला तुळस वाहा. मकर (Capricorn): सर्व्हिसमध्ये सकारात्मक कामगिरी कराल. व्यवहारात दक्षता वाढेल. सकारात्मक व्यवस्थापनामुळे उत्साही असाल. व्यवसायात प्रगती होईल. तुमच्याकडे एखादं ध्येय असेल. कोणाकडूनही कर्ज घेऊ नका. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची कार्यक्षमता मजबूत होईल. श्रमशक्तीमध्ये वाढ होईल. स्वत:ची जागा राखण्यासाठी जास्त कष्ट घ्याल. कामाचा उरक चांगला राहील. उपाय: निराधार मुलांना खाऊ द्या. कुंभ (Aquarius): व्यवसायात सर्वत्र सकारात्मकता राहील. नवीन व्यवसायात सक्रियपणे पुढे जाल. अनेक दिवसांपासून रखडलेल्या महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. करिअर व्यवसायात समजूतदारपणा दाखवल्याने अपेक्षित यश मिळेल. लाभ आणि विस्तारासाठी सुरू असलेले प्रयत्न सुधारतील. ऑफिसमध्ये वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. उपाय: घरातून बाहेर पडताना केशरी टिळा लावा. मीन (Pisces): छोटे व्यापारी आर्थिक बाबतीत धावपळ टाळतील. गुंतवणुकीच्या नावाखाली मोहात अडकू नका. व्यावसायाशी संबंधित प्रकरणं मिटतील. धाडसीपणा वाढेल. विरोधकांकडे लक्ष असू द्या. वाद टाळा. नोकरदारांनी स्वार्थीपणा सोडावा. व्यवस्थापन करणं योग्य ठरेल. चर्चा करताना तर्कशुद्धपणा ठेवा. वैयक्तिक कामांत अॅक्टिव्हनेस दाखवाल. उपाय: कामाच्या ठिकाणी गणपतीची पूजा करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.