ATM cash withdrawal limit: डिजिटल पेमेंटच्या युगातही कॅशची गरज टाळता येत नाही. UPI ट्रांझेक्शनमध्ये सातत्याने वाढ होतेय. तरीही अजूनही एक मोठा वर्ग आहे जो फक्त कॅश वापरण्यास प्राधान्य देतो. एटीएम मशिन्सही आता जागोजागी झाले आहेत. अशा परिस्थितीत कॅश उपलब्ध होणेही आपल्यासाठी खूप सोपं असतं. पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी सर्व बँका काही मर्यादा देखील घालतात. म्हणजेच, तुम्ही रोज एटीएममधून किती पैसे काढू शकता याबाबत वेगवेगळ्या बँकांचे स्वतःचे नियम आहेत. आज आपण काही प्रमुख बँकांच्या एटीएम लिमिटविषयी जाणून घेणार आहोत.
SBI बँक
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या फायनेंशियल प्रॉडक्ट्स ऑफर करते. बँक विविध प्रकारचे कार्ड देखील प्रदान करते. या कार्ड्सवरील कॅश विथड्रॉलची लिमिट वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ, क्लासिक डेबिट कार्ड किंवा मेस्ट्रो डेबिट कार्डमधून दररोज रोख पैसे काढण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे. SBI प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड्ससह, तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपये कॅश काढू शकता. SBI GO लिंक्ड आणि टच टॅप डेबिट कार्ड्सची लिमिट 40,000 रुपये आहे. SBI कार्डहोल्डर्स मेट्रो शहरांमध्ये महिन्यातून 3 वेळा मोफत पैसे काढू शकतात. इतर शहरांमध्ये 5 फ्री विथड्रॉल सुविधा उपलब्ध आहे. ही मर्यादा ओलांडल्यानंतर, तुम्हाला एसबीआय एटीएमवर 5 रुपये आणि नॉन-एसबीआय एटीएमवर 10 रुपये शुल्क भरावे लागेल.
PNB बँक
या सरकारी बँकेचे ग्राहक PNB Platinum Debit Card मधून दररोज ₹50,000 काढू शकतात. PNB क्लासिक डेबिट कार्डशी लिंक्ड खात्यातून जास्तीत जास्त 25,000 रुपये काढता येतात. Gold Debit Card ने लिंक्ड अकाउंटवरुन डेली कॅश विथड्रॉलची लिमिट 50,000 रुपये आहे. ही बँक इतर शहरांमध्ये 3 फ्री एटीएम विथड्रॉल आणि 5 डेबिट कार्ड विथड्रॉल्स सुविधा देते. इतर विथड्रॉल्सवर 10 रुपये चार्जिंग फीस आकारली जाते.
1 लाखांची FD मॅच्योरिटीपूर्वीच मोडली तर काय? किती लागतो दंड? जाणून घ्या नियमHDFC बँकेची लिमिट काय?
HDFC बँक डेबिट कार्ड यूझर्सला पाच फ्री ट्रांझेक्शन मिळतात. त्यानंतर फीस लागू होते. फॉरने विथड्रॉल्सवर 125 रुपये फीस आकारली जाते. Millenia Debit Card वर डेली कॅश विथड्रॉल लिमिट ₹50,000, मनीबॅक डेबिट कार्डवर ₹25,000 आणि रिवॉर्ड्स डेबिट कार्डवर ₹50,000 ची डेली कॅश विथड्रॉल लिमिट आहे.
Axis Bank लिमिट काय?
अॅक्सिस बँकेत रोख रक्कम काढण्याची मर्यादा दररोज 40,000 रुपये आहे. यामध्ये सर्व पैसे काढण्यासाठी 21 रुपये फीस आकारली जाते.
FD Time Period: कमीत कमी किती दिवसांसाठी करता येते FD?Bank of Barodi Cash Withdrawal Limit
बैंक ऑफ बड़ौदा के BPCL Debit Card से एक दिन में ₹50,000 रुपये, MasterCard DI Platinum Debit Card से ₹50,000 रुपये और MasterCard Classic DI Debit Card से डेली ₹25,000 रुपये निकाल सकते हैं.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाच्या BPCL Debit Card ने एका दिवसात ₹50,000 रुपये, मास्टर कार्ड , MasterCard DI Platinum Debit Card वरुन 50,000 रुपये आणि MasterCard Classic DI Debit Card वरुन डेली ₹25,000 रुपये काढता येऊ शकतात.