मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Net Asset Value | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी NAV म्हणजे काय? समजून घ्या नाहीतर तोटा निश्चित

Net Asset Value | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी NAV म्हणजे काय? समजून घ्या नाहीतर तोटा निश्चित

म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक (Investment) करताना एनएव्ही (NAV) अर्थात नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू हा शब्द तुम्हीही ऐकला असेल. मात्र, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? कारण, या शब्दाची माहिती असणे फार आवश्यक आहे. नाहीतर तुमचा तोटा होऊ शकतो.

म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक (Investment) करताना एनएव्ही (NAV) अर्थात नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू हा शब्द तुम्हीही ऐकला असेल. मात्र, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? कारण, या शब्दाची माहिती असणे फार आवश्यक आहे. नाहीतर तुमचा तोटा होऊ शकतो.

म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक (Investment) करताना एनएव्ही (NAV) अर्थात नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू हा शब्द तुम्हीही ऐकला असेल. मात्र, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? कारण, या शब्दाची माहिती असणे फार आवश्यक आहे. नाहीतर तुमचा तोटा होऊ शकतो.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 नोव्हेंबर: म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक (Investment) करताना गुंतवणूकदारांना (Investors) एक शब्द नेहमी ऐकण्यात येतो तो म्हणजे एनएव्ही अर्थात नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (NAV) म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य (Net Asset Value). हा या शब्दाशः अर्थ असला तरीही एनएव्ही म्हणजे प्रत्यक्षात काय? म्युच्युअल फंडात याचं काय महत्त्व असतं, गुंतवणुकीचा निर्णय घेताना एनएव्हीचा वापर कसा करायचा असतो? त्याबाबत अनेक गुंतवणूकदार अनभिज्ञ असतात. पण या प्रश्नांची उत्तरं माहीत असतील तर तुम्हाला गुंतवणुकीचा निर्णय घेताना अधिक सहजता येते. एनएव्हीला खूप महत्त्व आहे, त्यामुळे त्याबद्दल अगदी इत्यंभूत माहिती असायला हवी असं नाही पण प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे. आज आपण या एनएव्हीबद्दल जाणून घेऊ या.

सध्या बाजारात उत्तम लाभ देणाऱ्या अनेक म्युच्युअल फंड योजना (Mutual Fund Scheme) उपलब्ध आहेत. बहुतांश गुंतवणूकदार एजंटच्या सल्ल्याने गुंतवणूक करत असतात. अशावेळी योग्य माहिती नसल्याने नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपली गुंतवणूक लाभदायी होण्याकरता गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतील या बेसिक आणि अत्यंत महत्त्वाच्या टर्मची अर्थात एनएव्हीबद्दल (Net Asset Value) सविस्तर माहिती घेणं महत्त्वाचं आहे.

एखाद्या म्युच्युअल फंडांच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना किंवा त्याची विक्री करताना ती युनिटच्या प्रमाणात केली जाते. या प्रत्येक युनिटचा एक ठराविक दर किंवा निव्वळ किंमत (Value) असते. ही किंमत दर दिवशी बदलत असते आणि त्या दरानेच त्याची खरेदी किंवा विक्री होऊ शकते. हा दर म्हणजेच एनएव्ही. गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीची माहिती पाठवली जाते तेव्हा त्याच्या एसआयपीच्या रकमेत अमुक इतके युनिट घेतले असा उल्लेख असतो.

Personal Loan: या बँकांमध्ये मिळतंय सर्वात कमी दराने पर्सनल लोन, इथे तपासा यादी  

म्युच्युअल फंड योजनेचे बाजारमूल्य म्हणजे एनएव्ही

सोप्या शब्दात सांगायचं झाले तर, म्युच्युअल फंड योजनेचे बाजारमूल्य म्हणजे एनएव्ही. आपल्याला माहीतच आहे की, म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे शेअर मार्केटमध्ये शेअर, रोखे अशा विविध पर्यायांमध्ये गुंतवतात. यांचे बाजारमूल्य दर दिवशी बदलत असते, त्यामुळे एनएव्हीदेखील दिवसागणिक बदलत असते. प्रतियुनिटची एनएव्ही म्हणजे एखाद्या दिवशी असलेले योजनेचे बाजारमूल्य भागिले एकूण युनिट्सची संख्या. म्युच्युअल फंडाची कामगिरी नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूद्वारे (NAV) दर्शवली जाते. सेबीच्या (SEBI) नियमांनुसार, शेअर बाजार बंद झाल्यानंतर सगळ्या म्युच्युअल फंडातील योजनांची एनएव्ही जाहीर केली जाते.

गुंतवणुकीचा निर्णय घेताना एनएव्हीचा वापर करणं (Application) आवश्यक असतं. समजा, एखाद्या म्युच्युअल फंडाने आपल्याकडील निधी गुंतवून काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यानुसार, त्या योजनेतील निव्वळ मालमत्तेत काही युनिट्सची असतील. त्याचे एक ठराविक मूल्य निश्चित केले जाईल. ती त्या युनिटची एनएव्ही असेल. समजा हे मूल्य दहा रुपये असेल तर एखाद्या गुंतवणूकदाराने त्या योजनेत सुरुवातीला एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला दहा हजार युनिट्स (Units) मिळतील. काही वर्षांनी त्या फंडाच्या मालमत्तेचे मूल्य (Asset Value) वाढले तर प्रत्येक युनिटचे मूल्यही वाढते.

देशात Bitcoin ला चलन म्हणून मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - अर्थ मंत्रा

गुंतवणूकदाराने विक्री करण्याचा निर्णय घेतल्यास त्याला वाढलेल्या एनएव्हीनुसार किंमत मिळते. समजा, तुम्ही म्युच्युअल फंडाच्या योजनेत 10 हजार रुपये गुंतवले आणि त्याची एनएव्ही तेव्हा प्रती युनिट 200 रुपये आहे. तर तुम्हाला 50 युनिट्स मिळतील. समजा, एनएव्ही एका वर्षात 250 रुपयांपर्यंत वाढली आणि तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घेण्याचे ठरवले तर आता तुम्हाला 12,500 रुपये मिळतील कारण 50 युनिट्सला 250 रुपये प्रमाणे किंमत मिळेल. मात्र, एक बाब लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की यावर एक्झिट लोडदेखील लागू आहे. हे एक प्रकारचे शुल्क आहे जे वाढलेल्या एनएव्हीवर आकारले जाते. समजा, तुमच्या गुंतवणुकीवर एक्झिट लोड एक टक्के दराने आकारला गेला तर तुम्हाला 12,500 रुपये नाही तर 12,375 रुपये मिळतील. अशा प्रकारे  एनएव्हीवर गुंतवणूकीचे मूल्य अवलंबून असते. एनएव्ही वाढली तर फायदा होतो, कमी झाली तर नुकसान होते.

अनेकदा एजंट्सना कमिशन जास्त असते. त्यामुळे ते अशा योजनांची शिफारस करतात. त्यामध्ये एनएव्ही जास्त असेल तर गुंतवणूकदाराला कमी युनिटस मिळतात. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या फायद्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे एनएव्ही म्हणजे काय हे माहित असणे महत्त्वाचे असते. अनेकदा गुंतवणूकदारांमध्येही असा समज असतो की ज्या योजनेचा एनएव्ही जास्त, त्या योजनेची कामगिरी चांगली. पण असे काही नसते. गुंतवणूक करताना फक्त त्या दिवशीचाच एनएव्ही विचारात घेऊन चालत नाही. त्या योजनेतील आधीच्या एनएव्हीबरोबर तुलना करून त्या योजनेची कामगिरी कशी आहे, याचा अभ्यास केला तरच योग्य निर्णय घेण्यास मदत मिळते.

लवकरात लवकर पूर्ण करा हे काम, अन्यथा मिळणार नाही LPG Subsidy; वाचा सविस्तर

एकूणच आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरण्यासाठी त्या योजनेची एनएव्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. केवळ त्या दिवशीची एनएव्ही जाणून घेण्याऐवजी आधीची एनएव्ही लक्षात घेऊन तुलना करून गुंतवणूकीचा निर्णय घेणं आवश्यक ठरतं. आता तुम्हाला एनएव्हीबद्दल काही प्रमाणात माहिती मिळाली असेल. अधिक माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे अभ्यास करून गुंतवणूक करा कारण ती मोलाची आहे.

First published:

Tags: Investment, Mutual Funds, Savings and investments