मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Personal Loan: या बँकांमध्ये मिळतंय सर्वात कमी दराने पर्सनल लोन, इथे तपासा यादी

Personal Loan: या बँकांमध्ये मिळतंय सर्वात कमी दराने पर्सनल लोन, इथे तपासा यादी

देशात सणासुदीचा हंगाम संपत आला असला तरी, अनेक बँका अजूनही फेस्टिव्ह सीझनप्रमाणेच स्वस्त दरात वैयक्तिक कर्ज देत आहेत. इतकेच नाही तर अनेक बँका प्रोसेसिंग फीही (Processing Fee on Personal Loan) आकारत नाहीत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 29 नोव्हेंबर: देशात सणासुदीचा हंगाम संपत आला असला तरी, अनेक बँका अजूनही फेस्टिव्ह सीझनप्रमाणेच स्वस्त दरात वैयक्तिक कर्ज देत आहेत. इतकेच नाही तर अनेक बँका प्रोसेसिंग फीही (Processing Fee on Personal Loan) आकारत नाहीत. तुम्ही देखील वैयक्तिक कर्जाच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या बँका तुम्हाला कमी दराने पर्सनल लोन उपलब्ध करून देतील.

ज्यांना पैशाची तातडीची गरज आहे त्यांना वैयक्तिक कर्ज फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कर्ज हे एक प्रकारचे अनसिक्योर्ड कर्ज आहे, जे तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून घेऊ शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकता. सध्या लग्नसराईचा काळ आहे, या दरम्यान अशाप्रकारे पर्सनल लोन घेण्याकडे अनेकाचा कल असतो. लोन घेताना महत्त्वाची बाब म्हणजे त्यावर आकारला जाणारा व्याजदर. तुम्ही विविध बँकांमध्ये उपलब्ध पर्सनल लोनवरील व्याजदराचा (Personal Loan Interest Rate) अभ्यास करून कर्जासाठी अर्ज केला तर तुमचाच फायदा होईल. अशा काही बँका आहेत ज्या तुलनेने कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतात.

हे वाचा-Mutual Funds : दरमाह 10 हजार गुंतवणूक करा आणि बना करोडपती! कसं?

>> युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India Personal Loan)  ही बँक 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी 8.9 टक्के व्याजदराने कर्ज देते. यामध्ये तुमचा EMI 10,355 रुपये असेल.

>> सेंट्रल बँक (Central Bank Personal Loan) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB personal Loan) देखील 8.9 टक्के व्याज दरानेच वैयक्तिक कर्ज देत आहेत. PNB मध्ये प्रोसेसिंग फीवरही सूट आहे.

>> इंडियन बँकेतही (Indian Bank Personal Loan) सध्या चांगल्या स्वस्त दराने वैयक्तिक कर्ज मिळत आहे. बँकेत पर्सनल लोन 09.05 टक्के दराने मिळते आहे.

>> सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्यांच्या यादीत बँक ऑफ महाराष्ट्रचाही (Bank of Maharashtra Personal Loan) समावेश आहे. यामध्ये, वैयक्तिक कर्जावर वार्षिक 9.45 टक्के दराने व्याज आकारले जाईल.

हे वाचा-New IPO : 'या' दोन आयपीओमधून गुंतवणूकदारांना कमाईची संधी, तज्ज्ञ काय सांगतात?

>> पंजाब अँड सिंध बँक आणि IDBI बँक वैयक्तिक कर्जावर 9.5 टक्के व्याज दराने वैयक्तिक कर्ज देत आहेत. तुम्ही पाच वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास, दरमहा 10,501 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल

>> देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया देखील स्वस्त दरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँक प्रक्रिया शुल्क देखील आकारत नाही. पर्सनल लोनवर SBI मध्ये व्याजदर 9.6 टक्के आहे.

First published:

Tags: Money