Home /News /money /

Masked Aadhar Card: मास्क्ड आधारकार्डबद्दल माहित आहे का? कुठे केला जातो वापर? चेक करा सर्वकाही

Masked Aadhar Card: मास्क्ड आधारकार्डबद्दल माहित आहे का? कुठे केला जातो वापर? चेक करा सर्वकाही

सामान्य आधार कार्डप्रमाणे UIDAI द्वारे जारी केलेल्या मास्क्ड आधार कार्ड ID मध्ये सर्व क्रमांक दिसत नाहीत. यामध्ये फक्त शेवटचे चार अंक दिसतात.

    मुंबई, 29 मे : आधार कार्ड (Aadhar Card) हे सध्या आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. सरकारी अनुदानाचा लाभ घ्यायचा असो किंवा सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही कल्याणकारी योजनेचा (Government Schemes) लाभ घ्यायचा असो. या सगळ्यासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. एकीकडे आधार कार्डचे अनेक फायदे आहेत, तर दुसरीकडे अनेकवेळा यामुळे लोक फसवणुकीला बळी पडतात. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने फसवणूक टाळण्यासाठी सरकारने मास्क्ड आधार (Masked Aadhar Card) सुरू केला. हे आधार कार्ड धारकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून संरक्षण प्रदान करते. मास्क आधार कार्ड कसे आहे? सामान्य आधार कार्डप्रमाणे UIDAI द्वारे जारी केलेल्या मास्क्ड आधार कार्ड ID मध्ये सर्व क्रमांक दिसत नाहीत. यामध्ये फक्त शेवटचे चार अंक दिसतात. आधार कार्डचे पहिले 8 आधार क्रमांक मास्क्ड आधार कार्ड आयडीमध्ये 'XXXX-XXXX' असे लिहिलेले असतात. अशाप्रकारे आधार कार्डधारकाचा आधार कार्ड क्रमांक अनोळखी व्यक्तींसाठी लपवला जातो. यामुळे आधारचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर टाळता येईल. LIC Jeevan Labh योजनेत 10 रुपयांहून कमी गुंतवणूक करुन मिळवा 17 लाख, वाचा सविस्तर मास्क केलेले आधार कार्ड कोणीही डाउनलोड करू शकते मास्क आधार PDF स्वरूपात देखील उपलब्ध आहे. तो पासवर्डने सुरक्षित केलेला आहे. डाउनलोड केल्यानंतर, एक मास्क्ड आधार कार्ड पासवर्ड तुमच्या ईमेलवर पाठवला जातो. कोणत्याही प्रकारच्या गैरवापरापासून संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी, आधार कार्ड धारक आपले मास्क्ड आधार कार्ड 6 सोप्या स्टेप्समध्ये ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. तुमच्याकडील 500, 2000 ची नोट बनावट तर नाही ना? रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टने वाढली चिंता याप्रमाणे डाउनलोड करू शकता >> प्रथम, UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा आणि 'आधार डाउनलोड करा' पर्यायावर क्लिक करा. >> आधार / व्हीआयडी / नावनोंदणी आयडी पर्याय निवडा आणि मास्क्ड आधार पर्यायावर टिक करा. >> मागितलेली माहिती येथे भरा आणि 'OTP Request' पर्यायावर क्लिक करा. >> तुमच्या आधार-नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. ओटीपी एंटर करा आणि 'आधार डाउनलोड करा' वर क्लिक करा. >> आता, तुमचे मास्क्ड आधार कार्ड डाउनलोडसाठी उपलब्ध असेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Aadhar card, UIDAI

    पुढील बातम्या