Home /News /money /

LIC Jeevan Labh योजनेत 10 रुपयांहून कमी गुंतवणूक करुन मिळवा 17 लाख, वाचा सविस्तर

LIC Jeevan Labh योजनेत 10 रुपयांहून कमी गुंतवणूक करुन मिळवा 17 लाख, वाचा सविस्तर

LIC Jeevan Labh पॉलिसीमध्ये दर महिन्याला 233 रुपये गुंतवून तुम्ही मॅच्युरिटीवर 17 लाख रुपये सहज मिळवू शकता, म्हणजेच दररोज 8 रुपयांपेक्षा कमी पैशांची गुंतवणूक करावी लागेल.

    मुंबई, 29 मे : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC वर लाखो लोकांचा विश्वास आहे. या विश्वासाचे कारण म्हणजे एलआयसीच्या योजनांमधील (LIC Scheme) सुरक्षित गुंतवणूक आणि मॅच्युरिटीवर उच्च परतावा. जर तुम्ही आतापर्यंत एलआयसीच्या कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक केली नसेल, तर आम्ही तुम्हाला अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही सहजपणे करोडपती होऊ शकता. LIC जीवन लाभ पॉलिसी (LIC Jeevan Labh Policy) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. LIC ची जीवन लाभ पॉलिसी ही नॉन-लिंक केलेली योजना आहे. म्हणजेच ते शेअर बाजारावर अवलंबून नाही. या कारणास्तव, ही योजना देखील सुरक्षित मानली जाते. या पॉलिसीमध्ये दर महिन्याला 233 रुपये गुंतवून तुम्ही मॅच्युरिटीवर 17 लाख रुपये सहज मिळवू शकता, म्हणजेच दररोज 8 रुपयांपेक्षा कमी पैशांची गुंतवणूक करावी लागेल. येत्या 1 जूनपासून लागू होणार 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत गुंतवणुकीचे किमान वय फक्त आठ वर्षे ठेवण्यात आले आहे. म्हणजेच ही पॉलिसी अल्पवयीन व्यक्तीसाठीही घेतली जाऊ शकते. तसेच गुंतवणुकीसाठी कमाल वय 59 वर्षे आहे. ही पॉलिसी 16 ते 25 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी घेतली जाऊ शकते. 75 वर्षांपर्यंत लाभ घेऊ शकतात एलआयसीनुसार जर एखाद्या व्यक्तीने 21 वर्षांसाठी पॉलिसीची मुदत निवडली, तर पॉलिसी घेताना त्याचे वय 54 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. त्याच वेळी, 25 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी व्यक्तीची वयोमर्यादा 50 वर्षे आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीसाठी कमाल वयोमर्यादा 75 वर्षे ठेवण्यात आली आहे. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, नॉमिनीला लाभ मिळतो. नॉमिनीला बोनससह विमा रकमेचा लाभ मिळतो. या योजनेच्या इतर फायद्यांमध्ये कर सूट समाविष्ट आहे. RBI Rule: बँक FD करण्याआधी बदललेले नवे नियम समजून घ्या, नाहीतर घरबसल्या होईल मोठं नुकसान LIC जीवन लाभ साठी आवश्यक कागदपत्रे >> तुमचा पत्ता सत्यापित करणारी कागदपत्रे (Adress Prrof) >> योग्यरित्या भरलेला अर्ज (Application Form) >> केवायसी संबंधित कागदपत्रे. उदाहरणार्थ, पॅन, आधार, इन्कम टॅक्स रिटर्नशी संबंधित माहिती. >> आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी >> वयाचा पुरावा (Age Proof) >> वैद्यकीय इतिहास (Medical History)
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, LIC, Money

    पुढील बातम्या